गावापासूनचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे अंतर पाहता काही निकषांनुसार जी गावे एखाद्या प्राथमिक आरोग्य केंद्राला जोडलेली आहेत परंतु ती दुसऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या स्थानापासून जवळ आहेत अशी गावे जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्याचे अधिकार पुढीलप्रमाणे अटींच्या अधिन राहून संबंधित जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रदान करण्यात येत आहेत. १) समर्थनीय कारणांशिवाय असे बदल करण्यात येऊ नयेत. २) संबंधीत गावाच्या ग्रामसभेमध्ये तसेच संबंधित जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत बहुमताने ठराव मंजुर झालेला असणे आवश्यक राहील. सदर प्रस्ताव संबंधित जिल्हा परिषदांचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करण्यात येतील. ४) मान्यतेनंतर झालेल्या बदलासंदर्भात संबंधित जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी वेळोवेळी आरोग्य सेवा संचालनालयास कळविणे बंधनकारक राहील. ५) यापुर्वी शासनास प्राप्त झालेल्या यासंबंधित अनिर्णित प्रस्तावांना संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उक्त अटींचे पालन करून मान्यता द्यावी. संकेताक २०१४०७२१११४१४७५०१७
वेबसाइटचा उद्देश :-https://gr.ravindrachavan.in/ मुख्य उद्देश शासकीय निर्णय आणि परिपत्रके यांचा संग्रह एका केंद्रित व्यासपीठावर उपलब्ध करणे हा आहे. यामुळे नागरिक, संशोधक, आणि प्रशासकीय अधिकारी यांना आवश्यक माहिती त्वरित मिळू शकते.
या संकेतस्थळावर दिनांक निहाय व विषयनिहाय शासकीय निर्णय, राजपत्र, आणि इतर महत्वाचे दस्तऐवज डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत, ज्यामुळे नागरिकांना ही माहिती सहज उपलब्ध होते.