प्राथमिक शिक्षक बदली

by GR Team
0 comments 949 views

(टीप-खालील शिक्षक बदली बाबत दिनांक निहाय सर्व शासन निर्णय खालील प्रमाणे माहितीसाठी वाचू शकता.)

जिल्हा परिषद शिक्षक बदली धोरण ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक 18 जून 2024 व अधिक माहिती साठी येथे Click करा.

सुधारित बदली धोरणानुसार नवीन दि. १४ मार्च २०२३ उपरोक्त बाबींचा विचार करून शासनाने शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली धोरणाबाबत नव्याने विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने वरील संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णय अधिक्रमित करुन आता जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत शिक्षक संवर्गाच्या जिल्हांतर्गत बदलीसाठी या शासन निर्णयान्वये खालीलप्रमाणे सुधारीत धोरण / बदली संवर्ग निश्चित करण्यात येत आहे.

१.१ अवघड क्षेत्र :- परिशिष्ट १ मध्ये नमूद असणाऱ्या ७ बाबींपैकी किमान ३ बाबींची / निकषांची पूर्तता होईल असे गाव/शाळा अवघड क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात येईल. (अवघड क्षेत्राचे निकष खाली वाचा)
१.२ सर्वसाधारण क्षेत्र: वरील अवघड क्षेत्रात न मोडणारी गावे ही सर्वसाधारण क्षेत्रात मोडतील.
१.३ बदली वर्ष:- ज्या कॅलेंडर वर्षाच्या दिनांक ३१ मे पर्यंत बदल्या करावयाच्या आहेत ते वर्ष.
१.४ बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा:-अवघड क्षेत्र निहाय व सर्वसाधारण क्षेत्र निहाय बदली वर्षाच्या दिनांक ३१ मे पर्यंत पूर्ण झालेली एकूण सलग सेवा.
१.५ शिक्षक :- या शासन निर्णयाचे प्रयोजनार्थ शिक्षक म्हणजे जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक / पदवीधर शिक्षक / मुख्याध्यापक इत्यादी.
१.६ सक्षम प्राधिकारी :- शिक्षकांच्या बदल्यांसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सक्षम प्राधिकारी असतील.

अधिक माहिती साठी  शासन निर्णय PDF वर Click करून माहिती मिळवून घ्यावी.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या आधारे जिल्हा परिषदेअंतर्गत करावयाच्या पदभरती संदर्भात रिक्त पदे निश्चित करण्याबाबत व नियुक्त शिक्षकाच्या बदली सुधारित अटी लागू करणेबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक २१-०६-२०२३ साठी व अधिक माहिती साठी येथे Click करा.

राज्यात शासनाने विहीत केलेल्या कार्यपद्धतीनुसार शिक्षक भरतीसाठी जिल्हा परिषदांतर्गत रिक्त पदांची संख्या सुनिश्चित करताना तसेच भरतीनंतर शिक्षकांना द्यावयाच्या
नियुक्त्यांसाठी खालीलप्रमाणे सुधारीत अटी लागू करण्यात येत आहेत:-
१) ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची सन २०२२ मधील कार्यवाही पूर्ण झालेली आहे. तथापि, सदर बदल्यांमध्ये विनंती केलेल्या ज्या शिक्षकांना बदली मिळालेली नाही, अशा शिक्षकांचे विनंती अर्ज प्रतिक्षाधिन ठेऊन जशी पदे रिक्त होतील त्याप्रमाणे रिक्त पदी बदली देण्याबाबतची कार्यवाही ग्रामविकास विभागाने करावी. त्यानंतर आंतरजिल्हा बदली संपूर्णतः बंद करण्याची तरतूद ग्रामविकास विभागाने त्यांच्या बदली धोरणामध्ये करावी. तसेच, अवघड क्षेत्राच्या निकषांचे पुनर्विलोकन करुन सुधारीत निकषांचा समावेश बदली धोरणामध्ये करावा.
२) जिल्हाअंतर्गत बदलीसाठी जे शिक्षक पूर्वीपासून कार्यरत आहेत त्यांच्यापैकी बदली इच्छुक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार एक संधी देऊन जागा रिक्त असल्यास समुपदेशनाव्दारे रिक्त पदी नियुक्ती देण्यात यावी. समुपदेशनापूर्वी संभाव्य भरण्यात येणारी नवीन पदे विचारात घ्यावी व शाळास्तरावर समान शिक्षक राहतील याची दक्षता घ्यावी.
३) उपरोक्त प्रमाणे बदलीची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर आधार प्रमाणित संचमान्यतेनुसार रिक्त असणाऱ्या पदांची मागणी पवित्र प्रणालीवर करण्यात यावी. मागणी करण्यात आलेल्या रिक्त पदांच्या ८० टक्के पदे बिंदूनामावलीप्रमाणे भरण्याकरीता पवित्र प्रणालीव्दारे शिक्षक उपलब्ध करण्यात येतील.
४) नव्याने नियुक्ती झाल्यानंतर सदर शिक्षकांस जिल्हा बदलीचा हक्क राहणार नाही.
५) तथापि, नव्याने नियुक्तीनंतर इतर जिल्ह्यांत जाऊ इच्छिणाऱ्या शिक्षकांने रितसर राजीनामा देऊन पुन्हा विहीत प्रक्रीयेच्या माध्यमातून आवश्यकतेनुसार शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षा देऊन त्यातील गुणवत्तेच्या आधारे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक म्हणून नियुक्ती मिळविणे आवश्यक राहील.
६) जिल्हाअंतर्गत आपसी बदली, वैद्यकीय कारणास्तव तसेच तक्रारीच्या अनुषंगाने वा पती पत्नी एकत्रिकरणांतर्गत इ. अपवादात्मक प्रकरणी करावयाच्या बदली संदर्भात ग्रामविकास विभागाने धोरण ठरवावे.
७) पवित्र प्रणालीव्दारे शिक्षक उपलब्ध झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समुपदेशनाव्दारे पुढील कार्यपध्दतीप्रमाणे शिक्षकांची नियुक्ती करावी.
(अ) जिल्ह्यांमध्ये उपलब्ध असणाऱ्या रिक्त पदांची यादी तयार करण्यात यावी. सदर यादीमध्ये अवघड क्षेत्रातील सर्व रिक्त पदांचा समावेश राहील याची खात्री करावी.

अधिक माहिती साठी  शासन निर्णय PDF वर Click करून माहिती मिळवून घ्यावी.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या संगणकीय ऑनलाईन पद्धतीने होणं-या जिल्हातर्गत व आंतर जिल्हा बदली संदर्भात अभ्यासगट गठीत करणेबाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक १४-०३-२०२३ साठी व अधिक माहिती साठी येथे Click करा.

दिनांक ०४.०२.२०२० रोजीचा शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येत आहे. शासन निर्णय दि.०७.०४.२०२१ रोजीच्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदलीच्या प्रचलित संगणकीय बदली प्रक्रियेचा अभ्यास करुन त्यामध्ये काही सुधारणा करणे आवश्यक आहे काय अथवा सुधारित धोरण निश्चित करणे गरजेचे आहे काय, याबाबतचा अभ्यास करुन त्या अनुषंगाने शासनास शिफारस करण्यासाठी शासन खालीलप्रमाणे नवीन अभ्यासगट गठीत करीत आहे.
१) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे :अध्यक्ष
२) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक :सदस्य
३) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड. :सदस्य
४) उपायुक्त (आस्थापना), विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण :सदस्य
५) उपसचिव, जिल्हा परिषद आस्थापना, ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई:सदस्य
६) अवर सचिव, आस्था १४ कार्यासन, ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई : सदस्य सचिव

अधिक माहिती साठी  शासन निर्णय PDF वर Click करून माहिती मिळवून घ्यावी.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांबाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक १३ जानेवारी २०२३ साठी येथे क्लिक करा

शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया दिनांक ७.४.२०२१ च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार सुरु असल्यामुळे शिक्षक आणि शिक्षक संघटनांकडून प्राप्त होत असलेल्या मागणीच्या अनुषंगाने आता शासन निर्णयामध्ये किंवा बदली पोर्टलवर सुधारणा / बदल करणे उचित होणार नाही. तथापि, जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेमधील त्रुटींबाबत शिक्षक / शिक्षक संघटनांकडून वेळोवेळी प्राप्त झालेली निवेदने व मागण्यांच्या अनुषंगाने शासनाने स्थापन केलेल्या अभ्यासगटाकडून अभिप्राय मागविण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने अभ्यासगटाकडून प्राप्त होणाऱ्या शिफारशी विचारात घेऊन, त्यानुसार उचित निर्णय घेण्यात येईल. त्यानुसार शिक्षकांची सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबविण्यात येईल, ही बाब संबंधित शिक्षक संघटनांच्या निदर्शनास आणण्यात यावी.

अधिक माहिती साठी  शासन निर्णय PDF वर Click करून माहिती मिळवून घ्यावी.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यासाठी सुधारित धोरण ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक ०७-०४-२०२१ साठी येथे क्लिक करा

१.१ अवघड क्षेत्र :- परिशिष्ट १ मध्ये नमूद असणाऱ्या ७ बाबींपैकी किमान ३ बाबींची / निकषांची पूर्तता होईल असे गाव/शाळा अवघड क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात येईल.

१.२ सर्वसाधारण क्षेत्र: वरील अवघड क्षेत्रात न मोडणारी गावे ही सर्वसाधारण क्षेत्रात मोडतील

. १.३ बदली वर्ष: ज्या कैलेंडर वर्षाच्या दिनांक ३१ मे पर्यंत बदल्या करावयाच्या आहेत ते वर्ष.

१.४ बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा अवघड क्षेत्र निहाय व सर्वसाधारण क्षेत्र निहाय बदली वर्षाच्या दिनांक ३१ मे पर्यंत पूर्ण झालेली एकूण सलग सेवा.

१.५ शिक्षक : या शासन निर्णयाचे प्रयोजनार्थ शिक्षक म्हणजे जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक / पदवीधर शिक्षक / मुख्याध्यापक १.६ सक्षम प्राधिकारी: शिक्षकांच्या बदल्यांसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सक्षम प्राधिकारी असतील.

१.७ बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित घरावयाची सेवा ३ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झाली असेल असे शिक्षक

१.८ विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ खाली नमूद संवर्गाचे शिक्षक हे विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ म्हणून गणले जातील.

१.८.१ पक्षाघाताने आजारी शिक्षक (Paralysis)

१.८.२ दिव्यांग शिक्षक (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय दिनांक १४.१.२०११ मधील नमूद प्रारुपाप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक), मानसिक विकलांग मुलांचे व दिव्यांग मुलांचे पालक (पालक म्हणजे आई वडील किंवा ते नसल्यास बहिण भाऊ). तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत असे शिक्षक.
१.८.३ हृदय शस्रक्रिया झालेले शिक्षक
१.८.४ जन्मापासून एकच मूत्रपिंड (किडनी) असलेले मूत्रपिंड रोपण केलेले शिक्षक /डायलीसीस सुरु असलेले शिक्षक
१.८.५ यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक.
१.८.६ कॅन्सरने (कर्करोग) आजारी शिक्षक
१.८.७ मेंदूचा आजार झालेले शिक्षक
१.८.८ अॅलेसेमिया विकारग्रस्त मुलांचे पालक/जन्मजात गुणसुत्रांच्या दोषांमुळे उद्भवणारे आजार (उदा. Methyl Malonic Acidemia (MMA) Classical type (Mutase defiency व इतर आजार)) (पालक म्हणजे आई-वडील किंवा ते नसल्यास बहिण भाऊ)
१.८.९ माजी सैनिक तसेच आजी/माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी / विधवा
१.८.१० विधवा शिक्षक
१.८.११ कुमारीका शिक्षक
१.८.१२ परित्यक्ता / घटस्फोटीत महिला शिक्षक
१.८.१३ वयाची ५३ वर्षे पूर्ण झालेले शिक्षक
१.८.१४ स्वांतत्र्य सैनिकांचा मुलगा / मुलगी / नातू / नात (स्वातंत्र्य सैनिक हयात असेपर्यंत)
खालील आजाराने ज्या शिक्षकांचे जोडीदार व्याधिग्रस्त आहेत असे शिक्षक :
१.८.१५ हृदय शस्रक्रिया झालेले.

१.८.१६ जन्मापासून एकच मूत्रपिंड (किडनी) असलेले / मूत्रपिंड रोपण केलेले कर्मचारी /डायलिसीस सुरु असलेले.
१.८.१७ यकृत प्रत्यारोपण झालेले
१.८.१८ कॅन्सरने (कर्करोग) आजारी असलेले.
१.८.१९ मेंदूचा आजार झालेले.
१.८.२० बॅलेसेमिया विकारग्रस्त असलेले.
१.९ विशेष संवर्ग शिक्षक भाग २: पती-पत्नी एकत्रीकरण (जर सध्या दोघांचे नियुक्तीचे ठिकाण
एकमेकांपासून ३० कि.मी. पेक्षा जास्त अंतरावर असल्यास त्यांना विशेष संवर्ग शिक्षकांचा दर्जा प्राप्त होईल.)
१.९.१ पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील तर
१.९.२ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासकीय कर्मचारी असेल तर,
१.९.३ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा केंद्र शासकीय कर्मचारी असेल तर,
१.९.४ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचा कर्मचारी असेल तर, उदा. महानगरपालिका/नगरपालिका
१.९.५ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य अथवा केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी.
१.९.६ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा शासन अनुदानित संस्थेतील शिक्षक / कर्मचारी असेल तर,

अधिक माहिती साठी  शासन निर्णय PDF वर Click करून माहिती मिळवून घ्यावी.


You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

वेबसाइटचा उद्देश :-https://gr.ravindrachavan.in/ मुख्य उद्देश शासकीय निर्णय आणि परिपत्रके यांचा संग्रह एका केंद्रित व्यासपीठावर उपलब्ध करणे हा आहे. यामुळे नागरिक, संशोधक, आणि प्रशासकीय अधिकारी यांना आवश्यक माहिती त्वरित मिळू शकते. 

या संकेतस्थळावर दिनांक निहाय व विषयनिहाय शासकीय निर्णय, राजपत्र, आणि इतर महत्वाचे दस्तऐवज डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत, ज्यामुळे नागरिकांना ही माहिती सहज उपलब्ध होते.

© 2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept

Privacy & Cookies Policy