कार्यालयीन कार्यपद्धती नियमपुस्तिकेतील ५३ (८) येथील तरतूदीनुसार शासकीय पत्रे निर्गमित करताना पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या अधिकाऱ्याने स्वाक्षरीखाली कंसामध्ये नाव व त्याखाली पदनामाचा उल्लेख करण्याबाबत संदर्भाकित दिनांक १६ जून, २००५ तसेच दिनांक १० फेब्रुवारी, २०१६ च्या परिपत्रकान्वये सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.
२.
तथापि माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अनुसार राज्य माहिती आयुक्त, कोंकण खंडपीठ यांचेसमोर दाखल झालेल्या द्वितीय अपिल क्रमांक के. आर. – ४३२४ / २०१७ संदर्भातील सुनावणीच्या वेळी माहितीच्या अधिकारांतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या फेरफारावर संबंधित तलाठी यांचे नाव लिहिलेले नसल्याने, संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांची नावे शोधण्यास आता अडचण निर्माण झालेली असल्याचे आयोगाच्या प्रकर्षाने निदर्शनास आले आहे.
३.
सबब सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच त्यांच्या नियंत्रणाखाली सर्व विभाग /कार्यालये यांना पुन्हा सूचित करण्यात येते की, शासनाच्या वतीने करण्यात येणारा सर्व पत्रव्यवहार /प्रत्येक कागदपत्र / आदेश / पावती व इतर कोणत्याही प्रकारच्या दस्तऐवजावर सही करणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांनी सहीखाली स्वतःचे नाव, पदनाम व कार्यालय स्पष्ट शब्दात नमूद करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्याचे पदनाम नमूद करुन “करीता” असा उल्लेख करून पत्रे निर्गमित करण्यात येणार नाही, याची काटेकोरपणे दक्षता घेण्यात यावी.
-
2.3K
-
1.4K
-
1.5K
-
1.1K
-
587