ग्रामीण भागात प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देऊन संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी करणे, माता मृत्यूदर व बाल मृत्यूदर कमी करून माता व बालकांचे आरोग्यमान सुधारणे, माता व बाल आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवणे, आजारांचे वेळेत निदान व योग्य उपचार उपलब्ध करून देणे, गावांमध्ये आरोग्य शिक्षण व जनजागृती करून नागरिकांची आरोग्याप्रती जागरूकता वाढवणे, आरोग्य संस्थांच्या सुविधांमध्ये सुधारणा करून, गाव पातळीवर उत्तम उपचार व पुनर्वसन सेवा उपलब्ध करणे, केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची प्रभावी आणि १००% अंमलबजावणी सुनिश्चित करणे, गावांना आरोग्य आणि स्वच्छतेच्या निकषांवर गुणदान करून त्यांना आरोग्य संपन्नतेसाठी प्रेरित करणे तसेच प्राथमिक आरोग्य सेवा प्रत्येक व्यक्तीपर्यंत वेळेत आणि गुणवत्तेसह पोहोचवणे यासाठी राज्यामध्ये १ एप्रिल २०२६ पासून ” माझं गाव, आरोग्य संपन्न गाव” हे अभियान राबविण्यात येईल. ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकास प्रतिबंधात्मक, सुलभ, गुणवत्तापूर्ण आणि समग्र आरोग्यसेवा उपलब्ध करून देत एक निरोगी, सक्षम, जागरूक आणि सशक्त ग्रामीण समुदाय घडविणे हा या आरोग्य अभियानाचा मूलभूत दृष्टिकोन असून, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा शाश्वत व सहभागी विकास साधणे हीच या अभियाना मागील प्रेरणा आहे.
-
845
-
216