जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकाच्या आंतरजिल्हा बदल्या टप्पा ४ दि 18-01-2020 साठी येथे क्लिक करा
आंतरजिल्हा बदली प्रक्रियेसाठी सर्व जिल्ह्यातील ऑनलाईन संगणकीय प्रणालीव्दारे त्यांना अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
सदरच्या बदल्या ह्या पूर्वी निश्चित केलेल्या धोरणानुसार १०% पेक्षा जास्त जागा रिक्त असल्यास त्या जिल्हा परिषदांमधून शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने बाहेर जाता येणार नाही. जिल्ह्यातून बाहेर जाण्याकरीता रिक्त पदांची टक्केवारी १०% पेक्षा कमी असणे गरजेचे आहे.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी.
आंतर जिल्हा बदली दि 28-01-2019 साठी येथे क्लिक करा
अन्य जिल्हा परिषदेच्या जिल्हा सेवेतील कोणत्याही सदस्याने अर्ज केल्यानंतर, मुख्य कार्यकारी अधिकारी, दोन्ही जिल्हा परिषदांमध्ये परस्पर संमत करण्यात येतील.
(एक)केवळ बढती देऊन भरण्यात येणाऱ्या पदावर अशा नेमणूका करण्यात येणार नाहीत आणि त्या नामनिर्देशन करून नेमणूक करण्यासाठी ज्या रिकाम्या जागा राखून ठेवण्यात आलेल्या असतील, त्या रिकाम्या जागांवर करण्यात येतील.
दो) (आपसांत (परस्पर) बदलीने अशी नेमणूक झाल्यास अशा नेमणूक झालेली व्यक्ती आपल्या पूर्वीच्या जिल्हा परिषदेच्या ज्येष्ठता कायम ठेवील किंवा ज्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या पदावर परस्पर बदलीद्वारे नेमणूक झाली असेल त्या कर्मचाऱ्यांची ज्येष्ठता या दोन्हीपैकी जी कमी असेल ती ज्येष्ठता स्वीकारेल.
तीन) (कर्मचाऱ्यांच्या विनंतीवरून अशी नेमणूक झाल्यास किंवा अशा नेमणूक झालेल्या व्यक्तींची त्या संवर्गातील सेवाज्येष्ठतानंतरच्या जिल्हा परिषदेमध्ये अशी नियुक्ती ज्या तारखेस झाली असेल, त्या तारखेपासून राहील.
वरील तरतूद विचारात घेता आंतरजिल्हा बदली प्रकरणात सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी खालीलप्रमाणे कार्यवाही करावी.अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी.
जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ व वर्ग ४कर्मचाऱ्याना आंतरजिल्हा बदली बाबत दि ७/९/२०१८ साठी येथे क्लिक करा
29-09-2011 शासन निर्णयात पुढील प्रमाणे बदल
१) 29-09-2011च्या शासन निर्णयातील “५ वर्षाची सलग सेवा ” या ऐवजी ” ३ वर्षाची सलग सेवा ” असे वाचावे. तसेच
२) ” ग्रामसेवक यांचा ३ वर्षाचा कंत्राटी कालावधी यशस्वीपणे पुर्ण झाल्यानंतर ते आंतरजिल्हा बदलीस पात्र ठरतील.”प्राथम्यक्रम
विशेष संवर्ग :-
१) पक्षघाताने आजारी कर्मचारी (Paralysis)
२) अपंग कर्मचारी (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शा. नि. दिनांक १४.१.२०११ मधील नमुद प्रारुपाप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक) मतिमंद मुलांचे व अपंग मुलांचे पालक.
३) हृदय शस्त्रक्रिया झालेले कर्मचारी.
४) जन्मापासुन एकच मुत्रपिंड (किडनी) असलेले/मुत्रपिंड रोपण केलेले कर्माचारी/डायलेसिस सुरू असलेले कर्मचारी.
५) कॅन्सरने (कर्करोग) आजारी कर्मचारी / गंभीर आजाराने आजारी असल्याबाबत योग्य पुरावा सादर केलेले कर्मचारी.
६) मेंदूचा आजार झालेले कर्मचारी.
७) यॅलेसेमिया विकारग्रस्त मुलांचे पालक.
८) आजी/माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी/विधवा.
९) विधवा कर्मचारी / कुमारीका कर्मचारी.
१०) परित्यक्त्या/घटस्फोटीत महिला कर्मचारी. १०) परित्यक्त्या/घटस्फोटीत महिला कर्मचारी.
११) वयाची त्रेपन्न वर्षे पुर्ण झालेले कर्मचारी.
१२) सासु-सासरे वार्धक्याने (वय ७५ पेक्षा अधिक) त्रस्त आहेत अशा विवाहित महिला कर्मचारी.
१३) आई-वडील वार्धक्याने (वय ७५ पेक्षा अधिक) त्रस्त आहेत असे कर्मचारी.
१३) स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा/मुलगी/नातु/नात (स्वातंत्र्य सैनिक हयात असेपर्यंत)
वरील प्राथम्यक्रमात मोडणा-या कर्मचा-यांना आंतरजिल्हा बदली साठी सेवेची अट १ वर्षाची राहील.या प्राथम्यक्रमामध्ये मोडणा-या ग्रामसेवकांची बदली करतांना त्यांचा तीन वर्षाचा कंत्राटी कालावधी यशस्वीपणे पुर्ण करणे आवश्यक राहील.
वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदलीस परवानगी देताना जिल्हा परिषदेने
१) आंतरजिल्हा बदली केवळ सरळसेवेच्या पदावरच होईल.
२) कर्मचारी ज्या प्रवर्गाचा आहे त्या प्रवर्गाचा बिंदु संबंधीत जिल्हा परिषदेमध्ये रिक्त असला पाहिजे. बिंदु रिक्त नसल्सास बदली करता येणार नाही.
३) संबंधीत कर्मचा-यांकडे स्थायीत्व प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदली बाबत ग्रा वि वि दि 05-08-2017 साठी येथे क्लिक करा
आंतरजिल्हा बदलीने जर झालेल्या शिक्षकामध्ये जर गरोदर महिला, स्तनदा माता असतील तर अशा महिला शिक्षकांना सर्वप्रथम प्राधान्याने समायोजनाने पदस्थापना देण्यात यावी. अशी पदस्थापना देताना पुर्ण जिल्हात ज्या ठिकाणी बदलीने नियुक्ती देण्यास रिक्त जागा असतील (Clear Vacancy) त्या रिक्त जागेवर त्यांच्या सोईनुसार पदस्थापना देण्यात यावी.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी.
जिल्हा परिषद शिक्षकांना आंतरजिल्हा बदली बाबत ग्रा वि वि दि 31-07-2017 साठी येथे क्लिक करा
अ) विशेष संवर्ग भाग १ या संवर्गातील शिक्षकांना सर्वप्रथम प्राधान्याने समायोजनाने पदस्थापना देण्यात यावी. अशी पदस्थापना देताना पुर्ण जिल्हात ज्याठिकाणी बदलीने नियुक्ती देण्यास रिक्त जागा असतील (Clear “Vacancy) त्या रिक्त जागेवर त्यांच्या सोईनुसार पदस्थापना देण्यात यावी. म्हणजेच या संवर्गाला पदस्थापना देताना दि.७/७/२०१७ रोजीच्या पत्रामध्ये नमूद भरती करण्यात येणारे पदाचा प्राधान्यक्रम विचारात घेऊ नये.
ब) विशेष संवर्ग भाग २ या संवर्गातील शिक्षकांना पदस्थापना देताना, आंतरजिल्हा बदलीन संबधीत जिल्हात आलेल्या व्यक्तीचा जोडीदार त्याच जिल्हात कार्यरत असल्यास अशा आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना दि.७/७/२०१७ च्या पत्रामध्ये नमूद सुचनेनुसार जी पदे प्राधान्याने भरणे आवश्यक आहे, अशा जागी त्यांना नियुक्ती द्यावी. या नियुक्तीने संबधी । शिक्षकाला त्यांच्या जोडीदारापासून ३० किमी. परिसरात नियुक्ती मिळत नसल्यास संबधित शिक्षक व त्याचा जोडीदार जी पदे प्राधान्याने भरणे आवश्यक आहे, अशा पदावर दोघांना नियुक्ती द्यावी.
क) सदर पत्र प्राप्त होण्यापूर्वीच विशेष संवर्ग भाग-१ व भाग-२ मधील शिक्षकांना पदस्थापना देण्यात आलेली असेल, तर त्या पदस्थापनेमध्ये कोणताही बदल करण्यात येवू नये.अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी.
आंतरजिल्हा बदली बाबत दि 04-07-2017 साठी येथे क्लिक करा
१) ज्या प्रकरणामध्ये पती-पत्नी दोघे वेगवेगळया जिल्हयामध्ये कार्यरत असून त्या दोघांचीही एकमेकांच्या जिल्हा परिषदेमध्ये संगणकीय प्रणालीच्या माध्यमातुन आंतरजिल्हा बदली झालेली आहे.
२) ज्या प्रकरणात पती-पत्नी दोघे एकाच जिल्हा परिषदेत कार्यरत असुन दोघांनी अन्य जिल्हा परिषदेमध्ये आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज केला असुन त्यापैकी एकाचीच आंतरजिल्हा बदली झालेली आहे.अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी.
आंतर जिल्हा बदली, दि 24-04-2017 साठी येथे क्लिक करा
३. आंतरजिल्हा बदलीसाठी विचारात घ्यावयाच्या बाबी :-
३.१ जिल्हा परिषदेमध्ये बदली वर्षाच्या ३१ मे अखेर किमान ५ वर्षे सलग सेवा होणे आवश्यक आहे तसेच तो शिक्षक त्या पदावर कायम असणे आवश्यक आहे. या ५ वर्षाच्या कालावधीत संबंधित शिक्षकाचा शिक्षण सेवक या पदावर असलेला कालावधी विचारात घेतला जाईल. विशेष संवर्ग भाग १ व भाग २ मधील कर्मचाऱ्यांना सेवेची मर्यादा ३ वर्षांची असेल.
३.२ मात्र आंतरजिल्हा बदली हा संबंधित शिक्षकांचा हक्क असणार नाही.
३.३ जे शिक्षक पदोन्नत झालेले आहेत अशा शिक्षकांना आंतरजिल्हा बदली हवी असल्यास संबंधित शिक्षकानी अशी आंतरजिल्हा बदली मान्य झाल्यास स्वखुशीने पदावनत करण्याबाबत संमती पत्र दिल्यानंतरच त्या शिक्षकांचा आंतरजिल्हा बदलीसाठी विचार केला जाईल.
३.४ आंतरजिल्हा बदली प्रकरणात ज्या जिल्हा परिषदेचे रोस्टर (बिंदु नामावली) विभागीय आयुक्त, मागासवर्गीय कक्ष यांनी तपासून दिले नाहीत, अशा जिल्हा परिषदामध्ये फक्त शिक्षकांची आंतरजिल्हा बदली साखळी पध्दतीने होईल.
३.५. ज्या जिल्हा परिषदेचे रोस्टर (बिंदु नामावली) विभागीय आयुक्त, मागासवर्गीय कक्ष यांनी तपासून दिले आहे, अशा जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकांची आंतरजिल्हा बदली होईल.
३.६ या संदर्भात आंतरजिल्हा बदलीस इच्छुक असलेल्या शिक्षकांनी अर्ज करतांना एका जिल्हा परिषदेची निवड करणे आवश्यक राहील.अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी.
आंतर जिल्हा बदली दि 20-05-2015 साठी येथे क्लिक करा
संदर्भाधीन शासन परिपत्रकात (५) मध्ये ” आंतरजिल्हा बदलीसाठी कार्यरत जिल्हा
परिषदांमध्ये किमान ५ वर्षे सेवा पूर्ण करण्याची अट आपसी आंतरजिल्हा बदलीसाठी सुध्दा लागू राहील,” असे नमूद केले आहे.
” त्याऐवजी “
(५) ” आपसी आंतरजिल्हा बदलीसाठी कार्यरत जिल्हा परिषदेमध्ये किमान ३ वर्षे सेवा पूर्ण करणे आवश्यक राहील,” असे वाचावे.
जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचाऱ्याना आंतरजिल्हा बदलीने नेमणुक देण्याबाबत ग्रा दि १८/१०/२०१२ साठी येथे क्लिक करा
आंतरजिल्हा बदलीबाबत दिनांक २९ सप्टेंबर २०११ च्या शायन परिपत्रकामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे :-
१) सदर परिपत्रकाच्या अनुक्रमांक (३) मध्ये अंतर्भूत असलेल्या मार्गदर्शक तत्वातील “यास्तव एका जिल्हा परिषदेमध्ये सध्याच्या पदावर किमान ५ वर्षे सलगसंवा पूर्ण झालेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचीच आंतरजिल्हा बदली करण्यात यावी.” या शेवटच्या वाक्यातील “सध्याच्या पदावर” ही शब्दरचना वगळण्यात यावी. तसेच वर उल्लेखित वाक्याच्या खालील “तसेच सदर किमान ५ वर्षे सेवा कालावधीमध्ये सदर कर्मचाऱ्याचा शिक्षण सेवक पदावरील कालावधी अंतर्भूत राहील.” यामधील “शिक्षण सेवक” या शब्दापुढे “/” “कंत्राटी ग्रामसेवक” अशी खूण व शब्दरचना अंतर्भूत करून वाचण्यात यावी.
२) अनुक्रमांक (७) मधील परिच्छेद २ मधील (क) ही अट वगळण्यात यावी.
आंतर जिल्हा बदली दि 15-06-2012 साठी येथे क्लिक करा
शुध्दीपत्रक :- प्रशासकीय कारणास्तव 20-04-2012शासन निर्णयामध्ये खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे.
परिशिष्ट १ प्रकरण १ मधील २ (७) येथील तसेच रिक्त पदाबाबतीत असमतोलपणा राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. या वाक्यापुढे आदिवासी / नक्षलग्रस्त भागात दीर्घकाल सेवा केलेल्या प्रशासकीय बदली पात्र कर्मचाऱ्याची पुन्हा आदिवासी / नक्षलग्रस्त क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असल्यास, त्याची तालुकांतर्गत आदिवासी/नक्षलग्रस्त क्षेत्रातच पुन्हा बदली करता येईल. मात्र त्यांनी लेखी विनंती अर्ज करणे आवश्यक आहे. असे वाचावे.
जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचाऱ्याना आंतरजिल्हा प्रकरणे निकाली काढण्याबाबत ग्रावि व जल वि उपसचिव, जिपब-५११/प्रक्र ६२(२)ते ७०(२)/ आस्था-१४ दि १९/१०/२०११
आंतर जिल्हा बदली दि 29-09-2011 साठी येथे क्लिक करा
(१) महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम १९६७ मधील नियम ६ (८) मधील तरतुदीनुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना आंतरजिल्हा बदलीने अन्य जिल्हा परिषदांमध्ये नेमणूक देण्यास संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सक्षम प्राधिकारी आहेत. तसेच संबंधित कर्मचाऱ्यास बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करण्यासही ते सक्षम प्राधिकारी आहेत.
(२) अ) आंतरजिल्हा बदलीने एका जिल्हा परिषदेकडून दुसऱ्या जिल्हा परिषदेकडे जाऊ इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्याने प्रथमतः तो ज्या जिल्हा परिषदेतंर्गत कार्यरत आहे त्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे आंतरजिल्हा बदली मिळणेबाबत कारणासह विनंती अर्ज सादर करावा. पारावा.
ब) सदर अर्जासोबत कर्मचाऱ्याने त्याची सेवा विषयक माहिती व आवश्यक ते संमतीपत्र जोडावेत.
क) तसेच अपवादात्मक परिस्थिती असल्यास सदर अर्जासोबत कर्मचाऱ्याने त्याबाबतची संबंधित कागदपत्रे पुराव्या दाखल जोडावीत.
(३) आंतरजिल्हा बदलीने नेमणूक दिल्यानंतर, पूर्वीच्या जिल्हा परिषदेत सदर कर्मचारी काम करीत असलेले पद रिक्त होते आणि सदर पद विहित पध्दतीनुसार भरण्यास बराचसा कालावधी लागतो व त्यामुळे सदर पद दिर्घकाळ रिक्त राहते, त्याचा जिल्हा परिषदेच्या कामावर विपरीत परिणाम होतो. म्हणून आंतरजिल्हा बदलीने करावयाच्या नेमणूकीची संख्या मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. यास्तव एका जिल्हा परिषदेमध्ये सध्याच्या पदावर किमान ५ वर्षे सलग सेवा पूर्ण झालेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचीच आंतरजिल्हा बदली करण्यात यावी.
तसेच सदर किमान ५ वर्ष सेवा कालावधीमध्ये सदर कर्मचा-याचा शिक्षणसेवक पदावरील कालावधी अंतर्भूत राहील.
जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचाऱ्याना आंतरजिल्हा बदलीने नेमणुक देण्याबाबत ग्रावि व जल वि शा नि क्र जिपब-७११/प्रक्र ११३/११/आस्था-१४ दि २९/०९/२०११ साठी येथे क्लिक करा
जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचाऱ्याना आंतरजिल्हा बदलीने नेमणुका देण्याबाबत ग्रावि व जल वि शा नि क्र जिपब-७०६/प्रक्र ५०/ आस्था-१४ दि २१/०६/२००७ साठी येथे क्लिक करा
आंतर जिल्हा बदलीने दुसऱ्या जिल्हा परिषदेत बदलून गेलेल्या कर्मचाऱ्यास संबधीत जिल्हा परिषदेत आगाऊ वेतनवाढ देण्याबाबत ग्रावि व जल वि शा नि क्र लोआप्र-२००२ /प्रक्र ६३ / आस्था-०५ दि ०३/१०/२००३ साठी येथे क्लिक करा
जिल्हा परिषदेकडील वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचा-यांना आगाऊ वेतनवाढी देण्याबाबतचे सर्व समावेशक आदेश अ.क्र.१ येथील शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यांत आले आहेत. तथापि, त्यात आंतर जिल्हा बदलीने दुस-या जिल्हा परिषदेत बदलून गेलेल्या कर्मचा-यास आगाऊ वेतनवाढ देण्यात यावी किंवा कसे याबाबतचा उल्लेख नाही.
२.दरम्यान अशा आंतर जिल्हा बदलीने दुस-या जिल्हा परिषदेत बदलून गेलेल्या कर्मचा-याची सेवा ज्येष्ठता दुस-या जिल्हा परिषदेत शून्य होते असे सर्व जिल्हा परिषदांना अ.क्र.२ येथील दिनांक ३१ जुलै, १९९७ च्या शासन पत्रानुसार कळविण्यात आलेले आहे. त्यामुळे अशा कर्मचा-यास आगाऊ वेतनवाढ द्यावी किंवा कसे ही बाब शासनाच्या विचाराधीन होती.
३.प्राप्त परिस्थितीत, आंतर जिल्हा बदलीने बदलून आलेल्या अशा कर्मचा-यांचा त्याच्या पूर्वीच्या जिल्हा परिषदेकडील गोपनीय अहवालाच्या आधारे आगाऊ वेतनवाढीसाठी विचार करावयाचा झाल्यास, या विभागाच्या दिनांक ३१/१०/१९८९ च्या शासन आदेशानुसार जुन्या व नवीन जिल्हा परिषदेतील संबंधीत कर्मचा-याची एकाच पदावरील किमान सलग तीन वर्षे सेवा झालेली असावी. तसेच संबंधित कर्मचा-यांच्या जिल्हा परिषदेकडील गोपनीय अभिलेख्यांची प्रतवारी दिनांक ३१-१०-१९८९ च्या शासन आदेशानुसार असावी.
आंतर जिल्हा बदली दि03-10-2003