संगणक अर्हता अनिवार्य

by GR Team
0 comments 2.4K views

शासन निर्णय दिनांक – २७ नोव्हेंबर, २०२०. अनिवार्य संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदतवाढ ठरविणेबाबत व शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना अतिप्रदान करण्यात आलेल्या रकमेच्या वसूलीबाबतच्या शासन निर्णयास स्थगिती देण्याबाबत… महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग (माहिती तंत्रज्ञान),

संगणक अर्हता परिक्षेबाबत.
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग (माहिती तंत्रज्ञान) शासन पुरकपत्र क्र. मातंसं २०१२/प्र.क्र.२७७/३९, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई- ४०००३२ दिनांक : १६ जुलै, २०१८.

संगणक अहर्ता परीक्षेबाबत साप्रवि शानि क्र मातस/ प्रक्र २७७/३९ दि ४/२/२०१३

राज्य शासनाच्या गट अ, ब आणि क मधील कर्मचाऱ्यांना MSCIT या संगणकीय अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र धारण करणे अनिवार्य आहे. तथापि, खाली नमुद केलेल्या संगणक / माहिती तंत्रज्ञान विषयक परिक्षा उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना संगणक अर्हत्ता परिक्षा उत्तीर्ण असल्याचे समजण्यात येईल.
१) D.O.E.A.C.C./ N.E.I.L.I.T. नवी दिल्ली चे प्रमाणपत्रधारक.
२) राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय अभ्यासक्रमाच्या इयत्ता ९ वी व इयत्ता १० वी साठी माहिती तंत्रज्ञान विषय अभ्यासणाऱ्या विद्यार्थ्यांना व इयत्ता ११ वी व इयत्ता १२ वी साठी माहिती तंत्रज्ञान, संगणक शास्त्र, कॉम्प्युटर टेक्निक व मल्टीमिडीया अँड इंटरनेट टेक्नॉलॉजी हे विषय अभ्यासून उत्तीर्ण.
३) केंद्रीय माध्यमिक शालेय शिक्षण मंडळाची इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी ची परीक्षा संगणक / माहिती तंत्रज्ञान हे विषय घेऊन उत्तीर्ण.
४) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या संगणक तंत्रशास्त्र (Computer Technology)/संगणक अभियांत्रिकी (Computer Engineering) / माहिती तंत्रज्ञान (Information Technology) या विषयाचा राज्य तंत्रशिक्षण मंडळाचा पदवी / पदवीका व संगणक उपाययोजन (Computer Application), संगणक उपाययोजन पद्धती व पृथक्करण (ADCSSAA) या पदव्युत्तर प्रगत पदविका (Advance Diploma), सर्व शासन मान्य विद्यापीठातील संगणक तंत्रशास्त्र (Computer Technology) / संगणक अभियांत्रिकी (Computer Engineering) / माहिती तंत्रज्ञान (Information Technology) या विषयाचा राज्य तंत्रशिक्षण मंडळाचा पदवी / पदवीका व संगणक उपाययोजन (Computer Application), संगणक उपाययोजन पद्धती व पृथक्करण (ADCSSAA) या पदव्युत्तर प्रगत पदविका (Advance Diploma) उत्तीर्ण केलेले उमेदवारांना संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण.
५) व्यवसाय शिक्षण परिक्षा मंडळामार्फत चालविण्यात येणारे, परिशिष्ट अ मध्ये नमूद केलेले संगणक विषयी ८६ अभ्यासक्रमांचे प्रमाणपत्र पत्रधारक.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

MSCIT परिक्षेच्यापूर्वी शासनमान्य संस्थाकडील संगणक परीक्षा अहर्ता बाबत, साप्रवि शा नि क्र मातस/नस्ती०७ /प्र क्र71/३९ दि २१/२/२००८

शासन निर्णय दि. ७ ऑगस्ट २००१ अन्वये शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना MS-CIT परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे. दि. ७ ऑगस्ट २००१ च्या आदेशान्वये MS-CIT परीक्षा अनिवार्य करण्यापुर्वी संदभार्थिन 

दिनांक ३.३.१९९९ च्या शासन निर्णयान्वये (१) यशवंतराव चव्हाण विद्यापीठ, (२) डीओईएसीसी सोसायटी नवी दिल्ली, (३) सीडेंक पुणे, (४) सेंटर फॉर इलेक्ट्रॉनिक्स डिझाईन अॅड टेक्नॉलॉजी ऑफ इंडिया, औरंगाबाद व (५) तंत्रशिक्षण मंडळ महाराष्ट्र राज्य, मुंबई अशा एकूण पाच संस्थांकडून त्यांच्या नावासमोर दर्शविलेला संगणक प्रशिक्षण पाठ्यक्रम विहीत करण्यात आला होता. या शासन निर्णयाअन्वये MS-CIT परीक्षेपुर्वी म्हणजे दि. ७ ऑगस्ट २००१ पूर्वी ज्या अधिकारी कर्मचा-यांनी शासनाने विहित केलेली संगणक अर्हता वरील शासन मान्य संस्थांमधून उत्तीर्ण केली असेल त्यांनी विहित संगणक परीक्षा उत्तीर्ण केली असल्याचे समजण्यात येईल. तथापि उपरोक्त शासन पुरस्कृत संस्थामधून परीक्षा उत्तीर्ण

२.दि. २६ मे २००४ च्या आदेशान्वये महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या संगणक तंत्रशास्त्र (computer technology) / संगणक अभियांत्रिकी (computer Engg.) / माहिती तंत्रज्ञान (information technology) या विषयाच्या महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या पदवी / पदवीका व संगणक उपयोजन (computer application), संगणक उपयोजन पध्दती व पृथःकरण (ADCSSAA) या पदव्युत्तर /प्रगत पदवीका अभ्यासक्रमास मान्यता देण्यात आली आहे.
यानंतर सर्व शासन मान्य विद्यापीठांतील संगणक तंत्रशास्त्र / संगणक अभियांत्रिकी माहिती तंत्रज्ञान विषयातील पदवी /पदवीका तसेच संगणक उपयोजन, संगणक उपयोजन पध्दती व पृथःकरण या पदव्युत्तर / प्रगत पदवीका अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना विहित संगणक परीक्षा उत्तीर्ण समजण्यात येईल.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........

साप्रवि शा नि दि ५/५/२००७ संगणक अहर्ता परीक्षेस मुदत वाढ देण्या बाबत

संगणक अर्हता परिक्षा उत्तीर्ण करुन शासनास प्रमाणपत्र सादर करावयाच्या अवधीस दिनांक ०१.०१.२००७पासून दिनांक ३१.१२.२००७ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. अधिकारी/कर्मचाऱ्यांनी संगणक अर्हता परिक्षा उत्तीर्ण करुन शासनास प्रमाणपत्र सादर करण्यासाठी ही अंतीम मुदतवाढ समजण्यात यावी..
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........

,  साप्रवि शा नि   दि ७/७/२००५ व दि ९/६/२००६ संगणक अहर्ता परीक्षेस मुदतवाढ

संगणक अर्हता परिक्षा उत्तीर्ण करुन शासनास प्रमाणपत्र सादर करावयाच्या अवधीस दिनांक २०.०१.२००६
पासून दिनांक ३१.१२.२००६ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........

साप्रवि शा नि   दि ०८/०७/२००४ संगणक चाचणी परीक्षा उत्तीर्ण करून प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ   





साप्रवि शा नि दि २६/५/२००४ संगणक अहर्ता परीक्षेबाबत  


१) यापूर्वी निर्गमित करण्यात आलेल्या दि. ७ ऑगस्ट, २००१ व दि. २० जुलै, २००२ शासन निर्णयांन्वये खालील नमुद (अ) व (ब) यांना संगणक अर्हता परीक्षा म्हणून घोषित करण्यात आले होते, आता खाली नमुद केलेल्या (अ), (ब) व (क) या पर्यायांपैकी कुठलीही एक परीक्षा संगणक अर्हता परीक्षा म्हणून ग्राहय धरण्यात येईल (अ) D.O.E.A.C.C. सोसायटीच्या (केन्द्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागांर्तगत स्थापीत स्वायत्त संस्था) अधिकृत C.C.C. किंवा "O" स्तर किंवा "A" स्तर किंवा "B" स्तर किंवा "C" स्तर या पैकी कोणतीही
एक परीक्षा,
(ब) महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी MS-CIT परीक्षा,
(क) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी चाचणी परीक्षा (Confirmatory Test)
ज्या अधिकारी/कर्मचाऱ्यांनी पुर्वी पाच शासनमान्य संगणक संस्थांमधुन संगणक वापराबाबतचे विहित प्रमाणपत्र प्राप्त केले होते त्यांचेसाठी संगणक चाचणी परीक्षा (Confirmatary Test), उत्तीर्ण करणे आवश्यक होते. तथापि आता अशा अधिकारी/कर्मचाऱ्यांनी उपरोक्त नमूद, (अ), (ब), (क), या तीन पंर्यायी संगणक अर्हता परिक्षा म्हणून निश्चित करण्यात आल्यामुळे, या परीक्षांपैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक राहील. (यापूर्वीच्या अर्हतेसंबंधी काही कार्यवाही जसे प्रतिपुर्ती रकमेत कपात, वसुली इ. झाली असल्यास ती अबाधित राहील.)
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........

साप्रवि शा नि  दि १२/२/२००४ संगणक चाचणी परीक्षा उत्तीर्ण करून प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ   

शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांना संगणक चाचणी परीक्षेचे (Confirmatory Test) विहित प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून संगणक चाचणीचे विहित प्रमाणपत्र शासनास सादर करण्याचा अंतिम दिनांक २०.७.२००४ असा निश्चित करण्यात आला आहे.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........

साप्रवि शा नि दि २/९/२००३ शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांना संगणक प्रमाणपत्र सादर करण्यापासून सूट प्राप्त होण्यासाठी वयोमर्यादा  

शासन अधिसूचना, सामान्य प्रशासन विभाग, दि.२५.१.१९९९ अन्वये शासकीय सेवेतील गट “अ”, “ब” आणि “क” मधील अधिकारी/कर्मचारी यांनी संगणक हाताळणी/ वापराबाबतचे ज्ञान प्राप्त करुन विहित प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य ठरविण्यात आले आहे. तथापि, वयाचे ५५ वर्षे पूर्ण केलेल्या शासकीय सेवकास असे प्रमाणपत्र सादर करण्यापासून सूट देण्यात आलेली आहे.

सदर वयोमर्यादेत बदल/सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्य विचाराधीन होता. याबाबत सर्वंकष विचार करुन शासनाने आता असा निर्णय घेतला आहे की, सध्या शासन सेवेत असलेल्या गट “अ”, “ब” आणि “क” मधील वयाची ५० वर्षे पूर्ण केलेल्या शासकीय सेवकास संगणक अर्हतेचे प्रमाणपत्र सादर करण्यापासून सूट मिळेल.
२. सदरहू निर्णयानुसार दि. २५.१.१९९९ च्या अधिसूचनेत आवश्यक ती सुधारणा यथावकाश करण्यात येईल.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

वेबसाइटचा उद्देश :-https://gr.ravindrachavan.in/ मुख्य उद्देश शासकीय निर्णय आणि परिपत्रके यांचा संग्रह एका केंद्रित व्यासपीठावर उपलब्ध करणे हा आहे. यामुळे नागरिक, संशोधक, आणि प्रशासकीय अधिकारी यांना आवश्यक माहिती त्वरित मिळू शकते. 

या संकेतस्थळावर दिनांक निहाय व विषयनिहाय शासकीय निर्णय, राजपत्र, आणि इतर महत्वाचे दस्तऐवज डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत, ज्यामुळे नागरिकांना ही माहिती सहज उपलब्ध होते.

© 2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept

Privacy & Cookies Policy