मुंबई ग्रामपंचायत ( जिल्हा परिषदांनी कर्ज देणे ) नियम १९६९
जिल्हा ग्रामविकास नीधीच्या गुंतवणूकी बाबत. ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्रमांक:- क्र.व्हीपीएम2601/प्र.क्र.1643/22, दिनांक:- 16-05-2002
मुंबई जिल्हा ग्राम विकास निधी नियम, १९६० चे कलम ५ अन्वये जिल्हा ग्राम विकास निधीमधील रक्कमा गुंतविणे व पुन्हा गुंतविणेबाबत तरतूद करण्यात आलेली आहे. तथापि, सदर गुंतवणूक योग्य प्रकारे होत नसल्यामुळे दिनांक २२ नोव्हेंबर, २००० तसेच, दिनांक ८ जानेवारी, २००२चे समक्रमांकाचे परिपत्रकान्वये सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.
२. उपरोक्त सूचनांमध्ये जिल्हा ग्राम विकास निधीमधील मागील तीन वर्षाच्या सरासरी Withdrawls च्या दीडपटीपेक्षा जास्त रक्कमा Saving Accounts मध्ये रहाणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याबाबत पुर्नविचार करुन शासनाने असा निर्णय घेतला आहे की, जिल्हा ग्राम विकास निधीमधील सर्व शिल्लक रक्कम Saving Accounts मध्ये न ठेवता त्यापैकी जास्तीत जास्त रक्क्म जिल्हा ग्राम विकास निधी नियम, १९६० चे कलम ५ मधील तरतूदीनुसार ३० ते ४५ दिवसाच्या किंवा अधिक कालावधीच्या निश्चित ठेव योजनेत गुंतवावी आणि त्यापासून मिळणारे उत्पन्न आणि मूळ रक्कमा अशाप्रकारे गुंतवाव्यात की, ज्यायोगे शासनाला अधिकाधिक उत्पन्न मिळू शकेल आणि व्याजाची हानी होणार नाही. याबाबत जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीने सदर रक्कम गुंतवितांना त्यासाठी ग्रामपंचायतींना कर्जासाठी आवश्यक ती रक्कम तत्काळ उपलब्ध होईल नेही तारतम्याने ठरवावे.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
-
2.7K
-
2.3K
-
1.9K
-
2.3K