राज्यातील माजी सैनिक, शहिद सैनिक पत्नी व कुटुंबियांना शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये 15 टक्के गुणांची सवलत देणेबाबत. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग 30-06-2022 सांकेतांक क्रमांक 202206301643013621
शासन निर्णयः-
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांची पदे भरण्यासाठी पवित्र प्रणालीमार्फत घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेत विहित आरक्षणानुसार (TET) माजी सैनिक, शहिद सैनिकांच्या पत्नी व त्यांचे कुटुंबिय यांना १५ टक्के गुणांची सवलत देण्यास मान्यता देण्यात येत आहे. म्हणजेच, सदर गटातील उमेदवारांना उत्तीर्ण होण्यासाठी ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
सदर शासन निर्णयातील तरतूद नोव्हेंबर, २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेस (TET) व यापुढे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षांना लागू राहील. यासाठी आवश्यक ती कार्यवाही महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेने करावी.
संकेताक २०२२०६३०१६४३०१३६२१ अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
-
2.9K
-
1.4K