Home सार्वजनिक आरोग्य विभागमहाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ पदव्यूत्तर पदविका व पदव्यूत्तर पदवी अहर्ता व वेतनवाढ

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ पदव्यूत्तर पदविका व पदव्यूत्तर पदवी अहर्ता व वेतनवाढ

by GR Team
0 comments 2.7K views

पदविका व पदव्यूत्तर पदवी शैक्षणिक अहर्ता धारकास अनुक्रम ३ व ६ प्रोत्साहनपर वेतनवाढी मंजूर करणेबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय दिनां०३-०५-२०२१

दि. २०/८/२०१४ ऐवजी दि. १४/१२/२०११ पासून अनुक्रमे ३ व ६ अतिरिक्त प्रोत्साहनात्मक वेतनवाढी मंजूर करण्यात येत आहेत.
मात्र, वेतन मॅट्रीक्स मधील वेतन स्तर एस-२३:६७७००-२०८७०० (वेतनश्रेणी रु. १५६००-३९१०० ग्रेड पे रु. ६६००) मधील व त्यापेक्षा अधिक वेतनश्रेणीतील ज्या अधिकाऱ्यांनी शासन निर्णय दि. १४/१२/२०११ व दि. १९/११/२०१२ चा लाभ घेतला असेल त्यांना पुन्हा या योजनेचा लाभ अनुज्ञेय ठरणार नाही.

शासन सेवेतील स्थायी स्वरूपात वैद्यकीय अधिकारी पदावर नियुक्त झाल्यानंतर पदविका व पदव्यूत्तर पदवी धारकास ६/३ विशेष वेतनवाढी मंजूर करणे बाबत मा सहसंचालक मुंबई यांचे पत्र दि ०८-०२-२०१८

शासन निर्णयान्वये रुपये ५४००/- व त्यावरील वेतनश्रेणीवर कार्यरत असणा-या गट अ वैद्यकिय अधिका-यांना सदर लाभ अनुज्ञेय करण्यात आलेले आहेत. परंतू संचालनालयाच्या असे निदर्शनास आलेले आहे की, ३ व ६ वेतनवाढींचा लाभ घेतलेले काही वै‌द्यकिय अधिकारी हे विशेषज्ञाच्या सेवा पुरवित नाहीत. त्यामुळे जे अधिकारी विशेषज्ञ सेवा देत नाहीत त्यांना ३-६ वेतनवाढी देऊ नये व दिल्या असल्यास त्या वसूल करण्यात याव्यात.

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ या मधील पदव्यूत्तर पदविका व पदव्यूत्तर पदवी धारकास ६ व ३ विशेष वेतनवाढी मंजूर करणे बाबत सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय दिनां २०-०८-२०१४

 
महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट अ मधील वेतनबँड रु १५६००-३९१०० ग्रेड पे ६६०० व याहून अधिक वेतनश्रेणीच्या पदावर कार्यरत असणाऱ्या विशेषज्ञ संवर्ग, जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग, जिल्हा शल्य चिकित्सक संवर्गातील, पोलीस शल्य चिकित्सक तसेच उपसंचालक, सहसंचालक, अतिरिक्त संचालक व संचालक, आरोग्य सेवा या पदावरील पदव्युत्तर पदविका व पदव्युत्तर पदवी शैक्षणिक अर्हताधारक अधिकाऱ्यांना अनुक्रमे ३ व ६ अतिरिक्त प्रोत्साहनात्मक वेतनवाढी मंजूर करण्यात येत आहेत.
२. सदर शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून या प्रोत्साहनात्मक वेतनवाढी लागू राहतील.
३. ज्या अधिकाऱ्यांनी शासन निर्णय दिनांक १४.१२.२०११ व दिनांक १९.११.२०१२ मधील तरतुदींनुसार प्रोत्साहनपर वेतनवाढीचा लाभ अनुज्ञेय आहे, अशा अधिकाऱ्यांना या शासन निर्णयाचा पुन्हा लाभ अनुज्ञेय ठरणार नाही.
४. जे अधिकारी एकापेक्षा अधिक पदव्युत्तर पदविका धारण करीत आहेत, त्यांना कमाल ३ वेतनवाढी अनुज्ञेय राहतील. तसेच जे अधिकारी पदव्युत्तर पदवी अथवा पदव्युत्तर पदविपेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता धारण करीत आहेत, अशा अधिकाऱ्यांना कमाल ६ वेतनवाढी अनुज्ञेय राहतील.

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी पदावरील पदव्यूत्तर पदविका व पदव्यूत्तर पदवी अहर्ता धारकास विशेष वेतनवाढी मंजूर करण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय दिनां १९-११-२०१२


महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी (वेतनश्रेणी रु.१५६००-३९१०० + ग्रेड पे रु.५४००) या पदावर नियुक्ती झाल्यानंतर पदवीका अर्हताधारकास तीन अतिरिक्त वेतनवाढी व पदव्युत्तर पदवी अर्हताधारकास सहा अतिरिक्त वेतनवाढी सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय क्र. मवैअ-२०११/प्र.क्र.७७६/११/सेवा ३, दि.१४.१२.२०११ अन्वये मंजूर करण्यात आलेल्या आहेत.
२. “कार्यरत विशेषतज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही अतिरिक्त वेतनवाढीचा लाभ अनुज्ञेय राहील किंवा कसे” या बाबत सदर शासन निर्णयाच्या व्याप्ती संदर्भात अधिक स्पष्टीकरण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता, या शासन निर्णयान्वये प्रस्तूत बाब स्पष्ट करण्यात येत आहे की, आरोग्य सेवेतील महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, वैद्यकीय अधिकारी गट-अ (वेतनश्रेणी रु.१५६००-३९१०० + ग्रेड पे रु.५४००) या संवर्गात दि. १४.१२.२०११ रोजी कार्यरत असलेल्या व त्यानंतर वरीष्ठ पदावर पदोन्नत झालेल्या तसेच अश्वासित प्रगती योजनेअंतर्गत वरीष्ठ पदाची चेतनश्रेणी प्राप्त असलेल्या सार्वजनिक आरोग्य विभाग शासन अधिसूचना क्र. आरटीआर-१०९१/प्र.क्र.२२६/सेवा-३. F/GR….. 1
दि.३०.१०.२००० मधील नियम ३ (क) खालील परंतूकानूसार सदर पदासाठी आवश्यक किमान शैक्षणिक अर्हतेशिवाय वैद्यक शास्त्रातील (उच्चतर शैक्षणिक अर्हता) संविधिक विद्यापीठाची चिकित्सा विशेषज्ञाची पदव्युत्तर पदवी / पदव्यूत्तर पदविका अर्हताधारक वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णय दि.१४.१२.२०११ अनुसार अनुज्ञेय करण्यात आलेल्या प्रोत्साहानात्मक वेतनवाढीचा लाभ अनुज्ञेय राहील.
३. तथापि, ज्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे एका पेक्षा अधिक पदव्युत्तर पदविका धारण करीत असल्यास त्यांना कमाल तीन वेतन वाढी अनुज्ञेय राहतील. तसेच ज्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे एक पदव्युत्तर पदविका व एक पदव्युत्तर पदवी प्राप्त असल्यास किंवा एका पेक्षा अधिक पदव्युत्तर पदवी असल्यास त्यांना कमाल सहा वेतनवाढी अनुज्ञेय राहतील.

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी पदावर नियुक्ती झाल्यानंतर पदव्यूत्तर पदविका पदव्यूत्तर पदवी अहर्ता धारकास सहा वेतनवाढी मंजूर करण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय दिनां १४-१२-२०११

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी (वेतनश्रेणी १५६००-३९१०० + ग्रेड पे ५४००) या पदावर नियुक्ती झाल्यानंतर पदव्युत्तर पदवीका धारकास तीन अतिरिक्त वेतनवाढी व पदव्युत्तर पदवी धारकास सहा अतिरिक्त

वेतनवाढी मंजूर करण्यात याव्यात. सदर शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून या प्रोत्साहनपर वेतनवाढी लागु करण्यात याव्यात.

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

वेबसाइटचा उद्देश :-https://gr.ravindrachavan.in/ मुख्य उद्देश शासकीय निर्णय आणि परिपत्रके यांचा संग्रह एका केंद्रित व्यासपीठावर उपलब्ध करणे हा आहे. यामुळे नागरिक, संशोधक, आणि प्रशासकीय अधिकारी यांना आवश्यक माहिती त्वरित मिळू शकते. 

या संकेतस्थळावर दिनांक निहाय व विषयनिहाय शासकीय निर्णय, राजपत्र, आणि इतर महत्वाचे दस्तऐवज डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत, ज्यामुळे नागरिकांना ही माहिती सहज उपलब्ध होते.

© 2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept

Privacy & Cookies Policy