Home कर्मचारी हितार्थकार्यालयीन मार्गदर्शक कार्यालयीन कामकाज: पत्रलेखन

कार्यालयीन कामकाज: पत्रलेखन

by GR Team
0 comments 990 views

शासकीय पत्राचा नमुना विहित करणे तसेच त्यावर बोधचिन्ह (Logo) / घोषवाक्य (Tagline) मुद्रित करण्याबाबतचे धोरण. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांकः संकीर्ण २०१८/प्र.क्र.१५५/१८ (र. व का.) हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ दिनांक : १५ फेब्रुवारी, २०२०.

वाचा :
१) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक केमाअ २०११/४०८/प्र.क्र. २२९/सहा, दिनांक २२ नोव्हेंबर, २०११.
२) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक संकीर्ण २०१५/प्र. क्र.४७/१८ (र. व का.), दिनांक २४ जून, २०१५.
3) The Information Technology Act, 2000
प्रस्तावना :
कार्यालयीन कामकाज नियमपुस्तिका नियम १०२ अन्वये, केंद्र शासन, खाजगी व्यक्ती, राज्य शासनाचे अधिकारी यांना शासनामार्फत पाठवावयाच्या पत्रांसाठी वेगवेगळे नमुने विहित करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे उपरोक्त संदर्भ क्रमांक २ येथील दिनांक २४ जून, २०१५ च्या परिपत्रकान्वये, शासकीय पत्रव्यवहार करताना पत्रावर कार्यालयाचा संपूण पत्ता लिहिणे, दूरध्वनी क्रमांक, फॅक्स क्रमांक, ई-मेल आयडी इ. लिहिण्याबाबतच्या सर्वसाधारण सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.
तथापि मंत्रालयीन विभाग तसेच क्षेत्रिय कार्यालयांकडून निर्गमित होणाऱ्या पत्रांच्या नमुन्यामध्ये कोणतीही एकवाक्यता नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. याशिवाय शासकीय पत्रांवर बोधचिन्ह व चोषवाक्य मुद्रित करण्याबाबतचे कोणतेही धोरण / सूचना नसल्याने विविध मंत्रालयीन विभाग तसेच त्यांच्या नियंत्रणाखालील राज्य शासकीय कार्यालयांच्या पत्रांवर बोधचिन्ह / घोषवाक्य मुद्रित करण्याबाबतचे धोरण निश्चित करणे तसेच पत्राचा नमुना विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
परिपत्रक :
सदर परिपत्रकान्वये सूचित करण्यात येते की, सर्व मंत्रालयीन विभाग तसेच विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील शासकीय कार्यालयांनी यापुढे सोबतच्या नमुना “अ” मध्ये विहित केलेला पत्राचा नमुना पत्रव्यवहारात वापरावा. याकरीता महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील मुखपृष्ठावर (Home Page) “इतर दुवे या शीर्षाखाली उपलब्ध करून देण्यात आलेल्या Template चाच पत्राचा नमुना म्हणून उपयोग करण्यात यावा.

पत्रलेखना बाबत कार्यालयीन कामकाज नियमपुस्तिकेतील तरतुदीचे पालन करण्याबाबत सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक ३०-05 -२०१८

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

वेबसाइटचा उद्देश :-https://gr.ravindrachavan.in/ मुख्य उद्देश शासकीय निर्णय आणि परिपत्रके यांचा संग्रह एका केंद्रित व्यासपीठावर उपलब्ध करणे हा आहे. यामुळे नागरिक, संशोधक, आणि प्रशासकीय अधिकारी यांना आवश्यक माहिती त्वरित मिळू शकते. 

या संकेतस्थळावर दिनांक निहाय व विषयनिहाय शासकीय निर्णय, राजपत्र, आणि इतर महत्वाचे दस्तऐवज डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत, ज्यामुळे नागरिकांना ही माहिती सहज उपलब्ध होते.

© 2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept

Privacy & Cookies Policy