विवाह नोंदणी दाखल्यामध्ये दुरुस्ती करण्याबाबत, मा उपसंचालक आरोग्य सेवा ( आ माँ जी आ) पुणे यांचे कडील पत्र दिनांक २०/०२/२०१९
विधी व न्याय विभागाने दिलेल्या अभिप्राया नुसार ज्याअर्थी निबंधकास विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्याचे अधिकार आहेत त्याअर्थी General Clauses Act च्या कलम २१ नुसार निबंधकास नोंदणी प्रमाणपत्र दुरुस्त करण्याचे अधिकार आहेत. विवाह नोंदणी प्रमाणपत्र निर्गमित करण्याच्या अधिकारात विवाह नोंदणी प्रमाणपत्र दुरुस्त करण्याच्या अधिकाराचा समावेश होतो, त्यामुळे विवाह निबंधकास विवाह नोंदणी प्रमाणपत्रात दुरुस्ती करण्याचे अधिकार देण्यात कोणतीही कायदेशीर अडचण नाही. आपणास कळविण्यात येते की, आपण आपल्या कार्यक्षेत्रातील ग्रामिण व शहरी विभागातील विवाह निबंधकांना वर नमूद केल्याप्रमाणे कळवावे.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
विवाह नोंदणी शुल्काची रक्कम जमा करणेबाबत मार्गदर्शक सूचना दि ३०-१२-२०१७
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
विवाह नोंदणी करताना शपथ पत्र ऐवजी स्वयंमघोषणापत्र व कागदपात्रांच्या प्रती स्वीकारनेबाबत दि २०/०५/२०१७
नागरीकांची गैरसोय दुर करण्यासाठी प्रचलित कार्यपध्दती अधिक सुलभ करण्याचा हेतूने महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक ९ मार्च २०१५ रोजीच्या शासन निर्णयानुसार विवाह नोंदणी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना किंवा वधु, वर (पक्षकार) निबंधकाने विहीत नमुन्यातील शपथपत्र (Affidavit) व मुळ कागदपत्राच्या राजपत्र अधिकारी, विशेष कार्यकारी अधिकारी, इतर सक्षम अधिकारी यांनी सांक्षाकीत केलेल्या प्रती ऐवजी निबंधक, विवाह मंडळ व विवाह नोंदणी यांनी संदर्भिय शासन निर्णयात दिलेले नमुना प्रपत्र-अ स्वयंघोषणापत्र व नमुना प्रपत्र-व स्वयंसांक्षाकनासाठी स्वयंघोषणापत्र मध्ये कागद पत्राच्या स्वयंसाक्षांकित प्रती (Self attested copies) मध्ये नाहिती विवाह नोंदणीसाठी आलेल्या नागरीक, पक्षकार, यांच्याकडून विवाह निबंधकानी भरुन घ्यावे व संबंधीताना विवाह मंडळाची विनियमन आणि विवाह नोंदणी अधिनियम १९९८ व त्या खालील महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी नियम १९९९ मधील तरतुदी नुसार विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र संबंधिताना निर्गमीत करावे
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
विवाह नोंदणी कार्यक्रमासाठी वैद्यकीय अधिकारी यांना निबंधक विवाह मंडळ व विवाह नोंदणी म्हणून घोषित केले बाबत उपसंचालक आरोग्य सेवा पुणे यांचे पत्र दिनांक ०१-०२-२०१७
वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र यांना विवाह नोंदणीसाठी निबंधक घोषित केले नसल्याने, ज्या नगर पालिका/परिषद क्षेत्रात ग्रामिण रुग्णालय नाही, अशा ठिकाणच्या मुख्यााधिकारी, नगर पालिका/परिषद यांनी पुढील आदेश होईपर्यंत नियमितरित्या विवाह नोंदणी कार्यक्रमाचे कामकाज पार पाडावे. ग्रामिण भागातील सर्व ग्रामसेवक हे विवाह नोंदणी कार्यक्रमासाठी “निबंधक, विवाह मंडळ व विवाह नोंदणी” म्हणून पूर्वी प्रमाणेच कार्यरत राहतील त्यात कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
विवाह मंडलाची नोंदणी करने बाबत मा संचालक आरोग्य सेवा पुणे यांचे दि ०७-१०-२०१६
विवाह घटस्पोट /विघटन नोंदणी बाबत मार्गदर्शक सूचना मा संचालक आरोग्य सेवा पुणे यांचे दि ०५-०८-२०१६
महाराष्ट्र विवाह मंडळ व विवाह नोंदणी अधिनियम, १९९८ व त्या अंतर्गत तयार केलेल्या महाराष्ट्र विवाह मंडळ व विवाह नोंदणी नियम, १९९९ नुसार वधु-वराची विवाह नोंदणी करण्याची तरतुद आहे. तसेच एखादया विवाहीत पती-पत्नीचे घटस्फोट/विघटन झाल्यास, मा. न्यायालयाकडुन हुकुमनामा त्या पती-पत्नीस दिला जातो. अशा विवाह घटस्फोट, विघटन इत्यादीची नोंदणी करणेबाबत महाराष्ट्र विवाह मंडळ व विवाह नोंदणी नियम, १९९९ च्या नियम १० मधील वैधानिक तरतुद खालीलप्रमाणे आहे.
“१०(१) हिंदू विवाह अधिनियम, १९५५ (१९५५ चा २५) अन्वये करण्यात आलेले हिंदू विवाह व घटस्फोट नियम, १९५५ याच्या नियम (२२) अन्वये घटस्फोटाच्या प्रत्येक हुकूमनाम्याची, विवाह शून्यवत केल्याच्या किंवा विवाह विघटनाच्या प्रत्येक हुकूमनाम्याची निबंधकास मिळालेली प्रत्येक प्रत त्याच्याकडून विवाह नोंदवहीमध्ये दाखल करण्यात येईल आणि असा विवाह या अधिनिमान्वये नोंदविण्यात आलेला असेल तर अशा हुकूमनाम्याची नोंद समुचित ठिकाणी घेण्यात येईल.”अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
विवाह नोंदणी करतांना पक्षकारापैकी एक हयात नसेलेस मार्गदर्शना बाबत उपसंचालक आरोग्य सेवा पुणे यांचे पत्र दिनांक २०-०६-२०१६
विवाह महानिबंधक तथा नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय नविन प्रशासकीय इमारत, तळमजला, कॉन्सील हॉल समोर, पुणे कडे पक्षकारापैकी एक पक्षकार मयत असल्याने त्यांच्या विवाहाची नोंद कशा प्रकारे करावी व याबाबत मार्गदर्शन मिळणेकरीता विचारणा केली असता, त्यांनी खालील नमुद केल्या प्रमाणे कळविलेले आहे.
महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी अधिनियम, १९९८ मधील कलम ६ (१) (ख) मध्ये “विवाहातील पक्षकार आणि तीन साक्षीदार निबंधकासमोर व्यक्तिशः उपस्थित रहातील आणि ज्ञापनावर सही करतील” अशी तरतुद आहे. तथापी पक्षकारांपैकी एक पक्षकार हयात नसेल तर विवाह नोंदणी करता येइल कां? याबाबतची स्पष्ट तरतूद उत्क्त अधिनियमात नाही. महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी अधिनियम, १९९८ मध्ये याबाबतची तरतूदस्पष्ट नसल्यामुळे राज्य शासनाचे विधी व न्याय विभागाकडे अशा प्रकरणांसाठी मार्गदर्शन मागविण्याचे प्रस्तावित आहे. राज्य शासनाकडुन मार्गदर्शन प्राप्त होताच, सर्व विवाह निबंधकांना या कार्यालयाकडुन सुचना देण्यात येतील.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
ग्रामसेवक विवाह निबंधक नियुक्त सार्वजिनक आरोग्य विभाग अधिसूचना दिनांक ३०-०१-२००१
महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी अधिनियम, १९९८०
– महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी अधिनियम, १९९८ (१९९९ चा महाराष्ट्र अधिनियम २०) यांच्या कलम ३ च्या पोट-कलम (१) मधील प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन, राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवकांना त्यांच्या ग्रामपंचा यतीच्या क्षेत्रात विवाह निबंधक म्हणून नियुक्त करण्यात येत आहे. सदर अधिसूचना दिनांक १ फेब्रुवारी २००१ पासून अंमलात येईल.
The Maharashtra regulation of Marriage Bureaus 15-04-1999
ग्रामपंचायती मार्फत जन्म म्रत्यु आणि विवाह नोंदणी 21-12-1968
Registrion of Births Deaths and Marriages by Village Panchayats 21-12-1968
महाराष्ट्र विवाह मंडळ नोंदणी व विवाह नोंदणी विवाह मंडल नोंदणी /नोंदणीचे नुतनीकरण अर्ज