दस्त नोंदणी

by GR Team
0 comments 49 views

जिल्हाधिकारी यांचे पूर्वमंजुरीशिवाय नोंदणी न करणेबाबत दिनांक 04-02-2015


महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 चे कलम 36 अ मध्ये विक्री, अदलाबदल, बक्षीस, गहाणखत, भाडेपटटा किंवा “अन्यप्रकारे द्वारे होत असलेले व्यवहार प्रतिबंधीत केले आहे. मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी आदीवासी सर्वागीण विकास समिती विरुध्द महाराष्ट्र शासन पीआयएल क्रमांक 120/2010 मध्ये दिनांक 12/7/2013 रोजी दिलेल्या निर्णयामध्ये “अन्यप्रकारे” या शब्दप्रयोगामध्ये आदीवासी व विना आदीसावी मधील विकसन करार व मुखत्यांरनामा या दस्तांच्या माध्यमाने होत असलेले व्यवहार देखील प्रतिबंधीत होत असल्याचा निर्णय दिलेला आहे. सदर निर्णयाचे अनुषंगाने, सदंर्भ 2 चे शासनाचे निर्देशान्वये, सदंर्भ क्र.3 नुसार या कार्यालयाने परीपत्रक निर्गमित केलेले आहे.
मा. न्यायालयाने, कलम 36 अ अधिक स्पष्ट करतांना, अन्यप्रकारे Or otherwise शब्दप्रयोगामध्ये Widerness (व्यापकता) व Comprehensiveness (सर्वसमावेशकता) अंतर्भूत आहे. सबब आदीवासी व्यक्तींची वहीवाट विनाआदीवासी व्यक्तीच्या लाभात हस्तांतरीत करण्याचे योजिले असलेले सर्व करार (All Agreements) देखील अंतर्भूत होत असल्याने, असे करार मग त्या कोणत्याही नामाभिधानचे अथवा स्वरुपाचे असो, त्यात नमूद व्यवहार है प्रतिबंधित स्वरुपातील आहेत, असे स्पष्ट केलेले आहे.
वरील स्वरुपाच्या व्यवहाराचे पूर्तीकरीता करण्यात आलेले कोणतेही करार मग ते कोणत्याही नामाभिधनाचा असो, ते प्रतिबंधीक स्वरुपाचे असल्याने असे दस्त राज्य शासन व जिल्हाधिकारी यांचे पूर्वमंजूरीशिवाय नोंदणीस स्वीकारण्यात येऊ नयेत.
तसेच MLRC चे कलम 36(2) नुसार, अनुसूचित आदीवासी जमातींच्या व्यक्तींमधील आपसात होणा-या वहीवाटीचे हस्तांतरण देखील प्रतिबंधित आहे. यास्तव, सर्व दुय्यम निबंधक यांना सूचित करण्यात येते की, अशा व्यवहांराच्या पूर्ततेकरीता केलेल्या कोणत्याही प्रकारचे दस्त नोंदवितांना जिल्हाधिकारी यांची पूर्वपरवानगी दस्तास असेल तरच अशा दस्तऐवजांची नोंदणी करण्यात यावी.

घोषणापत्र व संमतीपत्राबाबत, नोंदणी निरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे यांचे कडील पत्र दिनांक 30/11/2013

नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाचे परिपत्रक क्रमांक का.४/प्र.क्र.६१७/११/३००८, दिनांक २२/१२/२०११ मधील पृष्ठ क्र.३ वरील अंतिम परिच्छेदातील “मात्र अशा प्रकरणांमध्ये प्रचलित बाजारमुल्यांकनानुसार मुद्रांक शुल्क भरुन, खरेदीखताचा दस्तऐवज संबंधित पक्षकार निष्पादित करुन, तो नोंदणीसाठी सादर करु शकतात, त्या खरेदीखताची इतर कायदेशिर तरतुदींची पुर्तता होत असल्यास नोंदणी करण्यास हरकत नाही” या मजकुराऐवजी पुढील मजकूर वाचण्यात यावा. मात्र अशा प्रकरणांमध्ये, मूळ व्यवहाराच्या पुर्ततेसाठी / पुरावा म्हणून संबंधित कायद्यानुसार विधीग्राहय असलेला नवीन दस्तऐवज त्या व्यवहाराच्या पूर्ततेसाठी आवश्यक असलेल्या सर्व पक्षकारांनी स्वतः किंवा विहित पध्दतीने प्राधिकृत केलेल्या व्यक्तीद्वारे निष्पादित केला असेल व त्यास महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम, १९५८ अन्वये यथोचित मुद्रांक शुल्क दिले असेल, आणि त्याच्या निष्पादनापासून नोंदणी अधिनियम १९०८ मधील कलम २३,२४ व २५ नुसार विहित मुदतीत नोंदणीसाठी सादर करण्यात आला असेल तर इतर कायदेशिर तरतुदींची पुर्तता होत असल्यास उक्त नवीन दस्तऐवज नोंदणीस स्विकारण्यास हरकत नाही “.

महाराष्ट्र नोंदणी नियम 1961 चे नियम 44 ची अंमलबजावणी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे यांचे कडील पत्र 02/11/2013

महाराष्ट्र जमीन महसूल अधि॑नियम 1966 चे नियम 36 व 36 अ नुसार आदिवासी व्यक्तींच्या वहिवाटींचे बिगर आदिवासींच्या लाभात हस्तांतरण राज्य शासनाच्या किंवा जिल्हाधिकारी यांच्या पूर्व मंजुरीची सत्य प्रत जोडली असेल तरच दस्त नोंदणी करणेबाबत नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे यांचे कडील पत्र 25/03/2013

महाराष्ट्र नोंदणी (सुधारणा) नियम 2005 नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे यांचे कडील पत्र 23/08/2006

महाराष्ट्र नोंदणी (सुधारणा) नियम 2005 नोदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे यांचे कडील पत्र दिनांक 04/12/2007

छापील दस्तऐवजाच्या नोदंणीबाबत, 25/1/1988

You may also like

About Us

वेबसाइटचा उद्देश :-https://gr.ravindrachavan.in/ मुख्य उद्देश शासकीय निर्णय आणि परिपत्रके यांचा संग्रह एका केंद्रित व्यासपीठावर उपलब्ध करणे हा आहे. यामुळे नागरिक, संशोधक, आणि प्रशासकीय अधिकारी यांना आवश्यक माहिती त्वरित मिळू शकते. 

या संकेतस्थळावर दिनांक निहाय व विषयनिहाय शासकीय निर्णय, राजपत्र, आणि इतर महत्वाचे दस्तऐवज डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत, ज्यामुळे नागरिकांना ही माहिती सहज उपलब्ध होते.

© 2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept

Privacy & Cookies Policy