मुद्रांक शुल्क परतावा आन लाईन कार्यवाही बाबत, 3/1/2014
मुद्रांक शुल्क परतावा अर्जाबाबत ऑन लाईन पध्दतीने करावयाची कार्यवाहीबाबत 28 06/1/2014
परतावा मुद्रांकाच्या खरेपणाबाबत छाननी, 13/7/2011
मुंबई मुद्राक अधिनियम १९५८ च्या कलम ५२ अ (१) (२) (३) अन्वये मुद्रांकाचा परतावा देण्याच्या प्रकरणांवर निर्णय घेण्यापूर्वी संबंधित मुद्रांक बनावट नाहीत याची खातरजमा केली जाणे आवश्यक आहे, अशा शासनाच्या वित्त विभागाच्या सूचना असल्याने या कार्यालयाचे परिपत्रक क्र. का.१२ / मु / परतावा / १९१०-६२ / दि.१३/५/१९९३ अन्वये परिपत्रक निर्गमित केले आहे. सप्टेंबर १९९४ पासून उमट मुद्रांक कार्यप्रणाली चालू झालेली आहे, या उमट मुद्रांका संदर्भातील खरेपणाबाबत देखील पडताळणी करणे आवश्यक झाले आहे. सर्व मुद्रांक जिल्हाधिकारी तथा सह जिल्हा निबंधक, सर्व नोंदणी उपमहानिरीक्षक व अप्पर मुद्रांक नियंत्रक, मुंबई यांनी फ्रैंकिंग केलेल्या मुद्रांकाबाबत खालील निष्कर्षाप्रमाणे काळजीपूर्वक छाननी करुन ज्या फ्रैंकिंग मुद्रांकामध्ये साशंकता निर्माण होणार नाही अशा मुद्रांकाचा परतावा देण्याबाबत निर्णय घ्यावा. त्यामुळे प्रस्तावित परिपत्रक खालीलप्रमाणे निर्गमित करण्यात येत आहे.
१) परवानाधारक मुद्रांक विक्रेत्याकडूनच फ्रैंकिंग करुन घेण्यात आले आहे, W ?
२) मुद्राक विक्रेत्याचे विक्री रजिस्टरला संबंधित फ्रैंकिंगची नोंद असल्याबाबत Authorised Signatory चे प्रमाणपत्र, आहे का ?
३) मुद्रांक विक्रेत्याकडून हायपर टर्मिनल रिपोर्ट प्राप्त झाला आहे, का ?
४) मुद्रांक विक्रेत्याचे लेटर हेडवर प्रमाणपत्र प्राप्त आहे. का ?
५) अल्ट्राव्हायलेट लॅम्पद्वारे मुद्रांकाची तपासणी केली आहे. का ?
६) मुद्राक विक्रेत्याकडून फ्रैंकिंग झालेल्या मुद्रांकांच्या मुळ ink cartridge ची तेवढ्यापुरत्ती छायाप्रत घेतलेली आहे का ?
७) त्याचप्रमाणे संबंधित विक्रेत्याने सदरचे मुद्रांक भरणेपूर्वी त्याकरीता आवश्यक कोड लोडींग योग्य प्रकारे केले असून त्याची रक्कम शासन जमा झाल्याबाबत संबंधित कार्यालयाकडून खात्री करुन तसे प्रमाणपत्र उपलब्ध करुन घेतले आहे का ?
परताव्यास पात्र असलेल्या मुद्रांक शुल्काचा परतावा विहीत मुदतीत करण्याबाबत, 15/5/2006
मुद्रांक परतावा प्रकरणांमध्ये निष्कारण होणारा विलंब टाळणेबाबत, 25/3/1997
मुद्रांक परतावा मंजुर करणेबाबत, 21/3/1996
मुद्रांकाचा परतावा मंजुर करण्याच्या प्रकरणी मुद्रांकाच्या खरेपणाबाबत छाननी करणे, 11/9/1995
मुद्रांक परतावा प्रतिज्ञापत्राबाबत, 2/7/1995
मुद्रांक परतावा प्रतिज्ञापत्राबाबत, 29/8/1994
मुद्रांकाचा परतावा मंजुर करण्याच्या प्रकरणी मुद्रांकाच्या खरेपणाबाबत छाननी करणे, 16/4/1993
परतावा प्रकरणात छाननीसाठी स्विकारावयाची कार्यपध्दती व काळजी, 24/11/1986