जलजीवन मिशन

by GR Team
0 comments 531 views

जल जीवन मिशन अंतर्गत १०० दिवसांचे विशेष अभियान सर्व ग्रामिण अंगणवाडी केंद्रांना शुद्भ् पेयजल उपल्बध करून देण्याबाबतची कार्यपद्धती पाणी पुरवठा व स्वछता विभाग शासन निर्णय दिनांक 27-11-2020 व अधिक माहिती साठी व शासन निर्णयासाठी येथे Click करा

 
जल जीवन मिशन अंतर्गत संदर्भिय क्र.१ च्या शासन निर्णयाद्वारे राज्यातील ग्रामीण भागातील कुटुंबासाठी नळाद्वारे गुणवत्तापुर्ण पेयजल पुरवठा करण्याचे निश्चित केले आहे. याच धर्तीवर ग्रामीण भागातील प्रत्येक अंगणवाडी केंद्रांना नळाद्वारे गुणवत्तापुर्ण पेयजल उपलब्ध करुन देण्याकरीता खालीलप्रमाणे कार्यपध्दती विषद करण्यात येत आहे.
१. ज्या अंगणवाडी केंद्रांना नळाद्वारे पाणी पुरवठा उपलब्ध नाही अशा अंगणवाडी केंद्रांना संबंधित अंगणवाडी पर्यवेक्षिका व कनिष्ठ अभियंता, समग्र शिक्षा यांनी व्यक्तिशः भेट देऊन पाणी पुरवठा उपलब्ध करण्याविषयी सविस्तर लेखी मागणीपत्र व अंदाजपत्रक तयार करावे.
२. सोबतच्या तक्त्यात नमुद केल्यानुसार तांत्रिक मान्यतेनंतर संबंधित अंगणवाडी पर्यवेक्षिका व कनिष्ठ अभियंता, समग्र शिक्षा यांनी खालील सूचनांप्रमाणे संबंधित ग्रामपंचायती/ मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना प्रशासकीय मान्यतेस प्रस्ताव सादर करावा.
३. बोअरवेल बाबतचे प्रस्ताव संबंधित जिल्ह्यातील भूजल सर्वेक्षण आणि विकास यांचेकडे सादर करावेत. त्यांनी उद्भवाचे प्रमाणपत्र त्वरित द्यावे. तांत्रिक मान्यता सोबतच्या तक्त्यात नमुद केल्यानुसार देण्यात यावी.
४. उपरोक्त प्रशासकीय मान्यता प्राप्त करण्यापर्यंतची कार्यवाही हा शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून ३० दिवसांच्या आत पुर्ण करण्यात यावी.
'परिशिष्ट-अ
शाळा/अंगणवाडी यांना नळ जोडणी देण्यासाठी अंदाजपत्रक तयार करताना घ्यावयाचे दरपत्रक व सूचना
१. ग्रामीण पाणी पुरवठा योजनांमध्ये नळ जोडणी संदर्भातील दर निश्चित करण्यात आले असून ते सोबत जोडलेल्या तक्त्यात नमुद आहेत. सदर दर GST विरहीत आहे. त्यामुळे अंदाजपत्रकात शेवटी १२% GST ची तरतूद करावी.
२. या निविदा GST दरविरहीत काढण्यात याव्यात व कंत्राटदाराच्या GST ची प्रतिपूर्ती त्यांनी भरलेल्या GST च्या आधारे करण्यात यावी.
३. या तक्त्यात नमुद केलेल्या बाबींचे तपशील (Description) व सविस्तर विवरण (Work Specification) अंदाजपत्रक व निविदा तयार करतांना जोडण्यात यावेत.
४. नळ जोडणी दर पृथ्थकरणात नळ जोडणीचे दर (With road Crossing) करीता वितरण वाहिनीपासून ग्राहकाच्या घरापर्यंत सरासरी १२ मी. लांबीचा पाईप घेतलेला आहे.
५. नळ जोडणी दर पृथ्थकरणात नळ जोडणीचे दर (Without road Crossing) करीता वितरण वाहिनीपासून ग्राहकाच्या घरापर्यंत ८ मी. लांबीचा पाईप घेतलेला आहे.
६. क्षेत्रिय परिस्थितीनुसार प्रत्यक्षात यापेक्षा जास्त लांबीच्या पाईपलाईनची आवश्यकता भासल्यास दरसूचितील अनुषंगीक बार्बीच्या समावेशासह (उदा. खोदकाम, पाईप, दर इ.) अंदाजपत्रकात वेगळी बाब अंतर्गत समावेश करण्यात यावा.
७. जर ग्राहकाचे स्थान (उदा. अंगणवाडी, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र इ. सार्वजनिक ठिकाण) वितरण वाहिनीपासून दूर असल्यास ग्राहकाला निकषानुसार ७ मी. दाबाने पाणी पुरवठा करण्यासाठी न्युनतम व्यासाची वितरण वाहिनी ग्राहकाच्या शक्य तेवढ्या जवळ टाकण्याच्या दृष्टीने पाईपलाईनच्या अतिरिक्त लांबीसाठी अंदाजपत्रकात वेगळीबाब अंतर्भूत करण्यात यावी. याबाबत "परिशिष्ट-ड" मध्ये नमुना अंदाजपत्रक दिलेले आहे. याप्रमाणे अंदाजपत्रक तयार करता येऊ शकतील.
८. घरगुती नळजोडणी १५ मि.मि. व्यासाची करण्यात यावी. यापेक्षा अधिक व्यासाची नळ जोडणी द्यावयाची असल्यास त्यासाठी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांची परवानगी आवश्यक राहील.
९. शाळा व अंगणवाडीस घ्यावयाचे नळ जोडणीचे व्यास शासन निर्णयात योजना मंजुरी कार्यपध्दतीत नमुद करण्यात आलेल्या तांत्रिक मान्यता देण्यास सक्षम क्षेत्रिय स्तरावरील अधिका-याने निश्चित करावेत.
१०. अतिरिक्त बार्बीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्रचलित दरसूचीनुसार दर घेण्यात यावेत.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........

राज्यात जलजीवन मिशन राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग शासन निर्णय दिनांक ०4-०९-२०२० अधिक माहिती साठी येथे Click करा

 
(१) राज्य मंत्रीमंडळाच्या दि. ८.०७.२०२० रोजी झालेल्या बैठकीत राज्यात केंद्र शासन प्रणित जल जीवन मिशन राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. यानुसार राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला सन २०२४
शासन निर्णय क्रमांकः जजमि २०१९/प्र.क्र.१३८/पापु-१० (०७)
पर्यंत, वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लिटर प्रती दिन, गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करण्याचे लक्ष्य आहे. सदर जल जीवन मिशन ५०:५० टक्के केंद्र व राज्य हिश्याने राबविण्यात येईल.
(२) उद्दिष्ट:
जल जीवन मिशनअंतर्गत, सन २०२४ पर्यन्त राज्याच्या ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबास घरगुती कार्यात्मक नळ जोडणीव्दारे विहित गुणवत्तेचे पाणी प्रती माणसी प्रती दिन किमान ५५ लिटर या प्रमाणात उपलब्ध करुन देणे अपेक्षित आहे.
(३) कृती आराखडा :
३.१) जल जीवन मिशन अंतर्गत राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला पिण्याच्या पाण्याची सुरक्षा (Drinking water security) देण्यासाठी प्रत्येक घरात कार्यात्मक नळ जोडणीव्दारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता ही किमान भारतीय दर्जा - BIS: १०५०० अशी असावी असे अपेक्षित केले आहे.
३.२) राज्यातील प्रत्येक घराला कार्यात्मक घरगुती नळ जोडणीव्दारे (Fuctional Household Tap Connections) पाणी पुरवठा करण्यासाठी बेस लाईन सर्वेक्षण करुन पुढील ४ वर्षाचे नियोजन करण्यात यावे.
३.३) जल जीवन मिशनअंतर्गत प्रत्येक कुटुबांस सन २०२४ पर्यंत घरगुती नळ जोडणीव्दारे पाणी पुरवठा सुविधा उपलब्ध करुन दयावयाची आहे. यानुसार गाव कृती आराखडा (VAP), जिल्हा कृती आराखडा (DAP) व राज्य कृती आराखडा (SAP) तयार करावा. सदर कृती आराखड्यामध्ये दयावयाच्या नियोजित घरगुती नळ जोडण्याचे व त्याकरिता आवश्यक असणाऱ्या निधीचे त्रैमासिक व वार्षिक नियोजन यांचा समावेश असावा. गाव कृती आराखडा तयार करण्यासाठी अंमलबजावणी सहाय्य संस्था (ISA), ग्रामीण पाणी पुरवठा विभाग/उपविभाग किंवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांची मदत घेण्यात यावी.
(४) जल जीवन मिशन अंतर्गत योजनांची अंमलबजावणी :
जलजीवन मिशनमध्ये पुढील प्रकारच्या योजनांचा समावेश करावा.
४.१) ज्या योजना राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम (NRDWP) अंतर्गत सुरु आहेत, अशा योजनांची सुधारणात्मक पुनर्जोडणी (Retrofitting) किमान ५५ LPCD प्रमाणे करून कार्यात्मक घरगुती नळ जोडणी करणे. तसेच ज्या गावांमध्ये स्टैंड पोस्ट नळ पाणी पुरवठा योजना आहेत, अशा गावांमध्ये स्टैंड पोस्टपासून प्रत्येक कुटुंबापर्यंत घरापर्यंत घरगुती कार्यात्मक घरगुती नळजोडणी देण्यासाठी पूर्वीच्या योजनांची सुधारणात्मक पुनर्जोडणी (Retrofitting) करणे.

४.२) पूर्ण झालेल्या योजनांच्या बाबतीत ४० LPCD ऐवजी किमान ५५ LPCD पाणीपुरवठा करण्याच्या अनुषंगाने अशा योजनांची सुधारणात्मक पुनर्जोडणी (Retrofitting) करणे.
४.३) ज्या गावांमध्ये पिण्यायोग्य मुबलक भूजल (किंवा अन्य पर्यायाद्वारे) उपलब्ध आहे, अशा गावांमध्ये स्वतंत्र योजना घेणे.
४.४) ज्या गावांमध्ये मुबलक भूजल (किंवा अन्य पर्यायाद्वारे) पाणीसाठा उपलब्ध आहे, मात्र पाण्याची गुणवत्ता योग्य नाही, अशा गावांमध्ये जल शुद्धीकरणाच्या प्रकल्पासह स्वतंत्र योजना घेणे.
४.५० ज्या गावांमध्ये पाण्याचे प्रमाण कमी आहे, अशा गावांसाठी प्रादेशिक / अनेक गाव योजना (Water Grid) घेणे.
४.६) आदिवासी भागात नळ पाणीपुरवठा सोय नसलेल्या आदिवासी गावे / वाड्या पाडे यांना कायमस्वरुपी पाणी पुरवठा करून प्रत्येक घरात कार्यात्मक नळजोडणीद्वारे पाणी पुरवठा करणे, जल जीवन मिशनच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, शासकीय वसतिगृहे, अंगणवाडी इत्यादी करिता सदर योजनेतून नळ जोडणी देणे. तसेच एकाकी/आदिवासी वाडी/पाड्यांकरीता सौर ऊर्जा आधारित नळ पाणी पुरवठा योजना राबविणे
४.७) दलित वस्तीमधील सर्व घरांना कार्यात्मक नळ जोडणीव्दारे पाणी पुरवठा देणे व योजनेच्या लाभार्थ्यांची स्वतंत्र माहिती ठेवणे.
(५) অल औवन निशानची नवीन अंगलवणवणी कार्यपद्धती
५.५१ पाणीपुरवठा योजनांच्या विशिष्ट उपांगाचे (पाण्याची टाकी, पंप हाऊत्य ईत्यादी) संभाव्य संकल्प चित्र आराखडे व त्यांची अंदाजपत्रके (भौगोलिक क्षेत्र आणि तेथील भौगोलिक परिस्थितीनुसार) राज्य पाणी व स्वचस्ता मिशनकडून तयार करून उपलब्ध करुन देण्यात येतील, त्याप्रमाणे सर्व यंत्रणांनी या आराखड्यानुसार पुढील कार्यवाही करावी.
५.२) पाणीपुरवठा योजनेसाठी लागणाऱ्या दर्जेदार (भारतीय मानांकनाप्रमाणे बांधकाम व अभियांत्रिकी साहित्य/यंत्रसामुग्रीचा (पाईप, विद्युत पंप, बॉल्व्स्स, सिमेंट, स्टील वगैरे) आवश्यकतेप्रमाणे दरकरार करणे /एजन्सी नेमणे ई. कार्यवाही राज्य पाणी व स्वच्छता मित्रानद्वारे करण्यात येईल, या दरपत्रकावर आधारित अंदाजपत्रके व आराखडे सर्व यंत्रणांनी करावेत.
५-३) राज्य पाणी व स्वच्छता मिशनच्या कार्यकारी समितीमार्फत पाणीपुरवठा योजनांच्या जलद अंमलबजावणीसाठी मध्यवर्ती निविदा प्रक्रियेद्वारे नामांकित बांधकाम संस्था व पुरवठादार यांचे जिल्ह्यांसाठी पॅनेल तयार करण्यात येईल. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन या पॅनेलमधून पाणीपुरवठा योजना करण्यासाठी एका योजनेकरीता एका संस्थेची निवड करेल. मात्र ग्राम पातळीवरील
शासन निर्णय क्रमांकः चचनि २०१९/प्र.क्र.१३८/पापु-१०००७
योजनांसाठी अशी निवड करताना जिल्हा समिती, ग्राम पाणी समितीला विश्वासात घेऊन/विचारविनिमय करून अंमलबजावणी संस्थेची निवड करेल,
५.४) जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांस्तठी प्रशासकीय मान्यता देण्यासंदर्भात राज्य पाणी व स्वच्छता मिशनकडून जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनला वित्तीय मदिचे अधिकार प्रदान केले जातील.
५.५) पाणी पुरवठा योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान आणि अंतिम देयक अदायगी करण्यापूर्वी जल जीवन मिशन ब्या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करण्यात येईल. राज्य पाणी व स्वच्छता मिशनच्या कार्यकारी समितीमार्फत नेमलेल्या त्रयस्थ तपासणी संस्थांचे पॅनेल मधील संस्थांमार्फत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनकडून या गावांच्या योजनांची त्रयस्थ तपासणी करण्यात येईल.
५.६) स्वतंत्र योजनेसाठी जास्तीत जास्त १८ महिन्यांचा व अनेक गाव योजनांसाठी ३६ महिन्यांचा कालावधी अनुज्ञेय राहिल. ज्या योजना पूर्ण करण्यास ३ वर्षांचा कालावधी लागणार आहे, अशा योजनांचे कार्यादेश/कार्यरंभ आदेश/करार (Con अंमलबजावणीकरिता मार्च २०२१ पूर्वी देश्यात यावेत. ज्या योजना पूर्ण करण्यास २ वर्षांचा कालावधी लागणार आहे. अशा योजनांचे कार्यदिश/कार्यरंभ आदेश/करार (Contract) अंमलबजावणीकरिता मार्च २०२२ पूर्वी देण्यात यावेत, यानुसार गाव कृती आराखडा (VAP) व जिल्हा कृती आराखडा (DAP) तयार करण्यात यावा,
(६) जल जीवन मिशनसाठी संस्थात्मक यंत्रणा :
जल जीवन मिशनच्या मार्गदर्शक सूचना दिनांक २५.१२.२०१९ रोजी केंद्र शासनाने प्रसिध्द केल्या आहेत हा एक कालमर्यादित कार्यक्रम आहे. विहित कालावधीत उद्दीष्टपूर्ती करण्याचे लक्ष्य असल्याने यासाठी मजबूत चार स्तरीय संस्थात्मक संरचना तयार करण्यात आली आहे. ती अशी:-
१) राष्ट्रीय स्तरावर "राष्ट्रीय जल जीवन मिशन" (NJJM)
२) राज्य स्तरावर राज्य पाणी व स्वच्छता मिशन (SWSM)
३) जिल्हा स्तरावर जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन (DWSM)
४) ग्राम पातळीवर ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती (WSC).
याअनुषंगाने राज्यात खालीलप्रमाणे संस्थात्मक यंत्रणा निर्माण करण्यात येत आहेत.
६.१. राज्य पाणी व स्वच्छता मिशन (SWSM)
६.१.१ पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील योजनांसाठी या विभागामार्फत दिनांक १०.०२.२०१० रोजी संस्था नोंदणी अधिनियम, १८६० अंतर्गत राज्य पाणी व स्वच्छता मिशनची नोंदणी करण्यात आली आहे. या मिशनमध्ये राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समिती आहे. जल
शासन निर्णय क्रमांकः जजमि २०१९/प्र.क्र.१३८/पापु-१०(०७)
जीवन मिशन व स्वच्छताविषयक कार्यक्रमांचे राज्यातील नियोजन, अंमलबजावणी, संनियंत्रण याबाबत संपूर्ण जबाबदारी व अधिकार राज्य पाणी व स्वच्छता मिशनला आहेत. जल जीवन मिशनच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे राज्य पाणी व स्वच्छता मिशनला कार्य करण्याचे संपूर्ण अधिकार आहेत. राज्य पाणी आणि स्वच्छता मिशनला (SWSM) जल जीवन मिशनसाठी कार्यान्वयन यंत्रणा म्हणून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........

You may also like

Leave a Comment

About Us

वेबसाइटचा उद्देश :-https://gr.ravindrachavan.in/ मुख्य उद्देश शासकीय निर्णय आणि परिपत्रके यांचा संग्रह एका केंद्रित व्यासपीठावर उपलब्ध करणे हा आहे. यामुळे नागरिक, संशोधक, आणि प्रशासकीय अधिकारी यांना आवश्यक माहिती त्वरित मिळू शकते. 

या संकेतस्थळावर दिनांक निहाय व विषयनिहाय शासकीय निर्णय, राजपत्र, आणि इतर महत्वाचे दस्तऐवज डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत, ज्यामुळे नागरिकांना ही माहिती सहज उपलब्ध होते.

© 2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept

Privacy & Cookies Policy