Home कर्मचारी हितार्थवित्तीय मार्गदर्शक शासन निर्णय वेतन निश्चिती: एका पदावरुन दुस-या नवीन पदावर नियुक्‍त

वेतन निश्चिती: एका पदावरुन दुस-या नवीन पदावर नियुक्‍त

by GR Team
0 comments 1.4K views

एका पदावरुन दुस-या नवीन पदावर नियुक्‍त होत असताना त्‍या दुस-या पदावरील कर्तव्‍ये आणि जबाबदा-या पहिल्‍या पदापेक्षा अधिक नसतील तेव्‍हा करावयाची वेतननि‍श्चिती व त्‍यासाठी द्यावयाचा विकल्‍प. वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक:- वेतन1289प्रक्र46सेवा%3, दिनांक:- 03-04-1990

शासन निर्णय
रका पदावरून दुस-या नवीन पदावर नियुक्ती झाल्यावर जेव्हा दुस-या पदावरील कर्तव्ये आणि जबाबदा-या पहिल्या पदापेक्षा अधिक नसतात तेव्हा करावयाची वेतन-निश्चिती व त्यापुढील देय वेतनवाढ ह्या संबंधीची तरतूद महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन] नियम, १९८१ मधील नियम ११ [२] मध्ये करण्यात आलेली आहे. त्याअन्वये नवीन पदाच्या वेतनश्रेणीमध्ये शासकीय कर्मचा-याचे वेतन नवीन पदाच्या वेतनश्रेणीमध्ये पुन्यार पदाच्या वेलनाएवढ्या रकमेचा टप्या असल्यात त्याच समान टप्प्यावर निश्चित करण्यात येते, अथवा जर नवीन पदाच्या वेतनश्रेणीमध्ये त्याच्या जुन्या पदाच्या वेतनाएवढ्या रकमेचा टच्या मतेल तर त्या जुन्या पदाच्या वेतनाच्या लगतपूर्वीच्या टप्प्यावरील वेतन अधिक त्या दोहांमधील फरकाच्या रकमेइतके वैयक्तिक वेतन देण्यात येते. वरील दोन्ही बाबतीत त्याला जुन्या पदाच्या वेतनश्रेणीमधील वेतनवाढ जेव्हा मिळू शकली असती. ती तारीख, किंवा नवीन पदाच्या वेतनश्रेणीतील वेतनवाढ जेव्हा देय होईल ती तारीब यापैकी अगोदरची असेल त्या तारखेत त्याला पुढील वेतनवाढ मिळते.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........

एका पदावरुन अधिक महत्‍वाची कर्तव्‍ये आणि जबाबदा-या असलेल्‍या दूस-या पदावर पदोन्‍नती नियुक्‍ती झाल्‍यानंतर करावयाच्‍या वेतन निश्चिती बाबत . वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक:- वेपुर1288-580सेवा-1, दिनांक:- 18-10-1988


शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक पीएवाय. १०८२/सीआर-११०० (दोन) /सेवा-३, दिनांक ६ नोव्हेंबर १९८४ अन्वये असे आदेश देण्यात आले आहेत की, वर्ग एक मधील ज्या पदांचे विद्यमान श्रेणीतील प्रारंभिक वेतन क. १५०० पर्यंत आहे अशा पदांवर पदोन्नती/नियुक्ती झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याचे वेतत महाराष्ट्र नागरी सेवा (बेसन) नियम, १९८१ च्या नियम ११ (१) (ए) मधील तरतुदीनुसार निश्चित करण्यात यावे. म्हणजेच, अशा कर्मचाऱ्यांचे वेतन, वरच्या पदाच्या वेतनश्रेणीमधील अशा टप्प्यावर निश्चित करण्यात यावे जो टप्पा खालच्या पदामधील त्याने घेतलेले वेतन एक वेतनवाढ देऊन काल्पनिकरित्या वाढविल्यानंतरचा असेल. हा लाभ वर्ग एक मधील इतर अधिकाऱ्यांना देण्याचा प्रश्न शासनाच्या काही काळ विचाराधीन होता...
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........

एका वर्ग एक पदावरुन दुस-या वर्ग एक पदावर पदोन्‍न्‍ती झाल्‍यानंतर वेतननिश्‍चती करण्‍या बाबत-स्‍पष्‍टीकरण. वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक:- वेतन-1086-सीआर160-सेवा-3, दिनांक:- 25-03-1986

शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक पीस्वाय १०८२/सीआर ११०० [२], दिनांक ६ नोव्हेंबर १९८४ घ्या संदर्भात अधिदान व लेखाधिकारी यांनी त्यांच्या क्रमांक अ.ले./टीएम/फ-३८ [३]/६३९, दिनांक ३१ डिसेंबर १९८५ च्या पत्रात असा मुद्दा उपस्थित केला आहे की, रु.१,५००/- पर्यन्त आरंभ होणा-या वेतनश्रेणीत रु. १,५००-१९२५ या वेतनश्रेणीचा समावेश होतो किंवा नाही. कारण रु.१,५००/- पर्यन्त म्हणजे रु. १,४९९-९९ असा अर्थ घेतला जातो. त्याबाबत असे स्पष्टीकरण करण्यात येत आहे की, या वेतन निश्चितीचा फायदा रु. १,५००/- हून अधिक आरंभ वेतन असणा-या वेतनश्रेणीत पदोन्नती झामेल्यांना देय नाही म्हणजेच उदा. रु १,५००-१९२५ या वेतनश्रेणीतील पदोन्नतीला फायदा मिळेल. 
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

वेबसाइटचा उद्देश :-https://gr.ravindrachavan.in/ मुख्य उद्देश शासकीय निर्णय आणि परिपत्रके यांचा संग्रह एका केंद्रित व्यासपीठावर उपलब्ध करणे हा आहे. यामुळे नागरिक, संशोधक, आणि प्रशासकीय अधिकारी यांना आवश्यक माहिती त्वरित मिळू शकते. 

या संकेतस्थळावर दिनांक निहाय व विषयनिहाय शासकीय निर्णय, राजपत्र, आणि इतर महत्वाचे दस्तऐवज डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत, ज्यामुळे नागरिकांना ही माहिती सहज उपलब्ध होते.

© 2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept

Privacy & Cookies Policy