988
सार्वजनिक अभिलेख व्यवस्थापन अधिसूचना १७-०१-२००६
(क) पुराभिलेखांचे पर्यवेक्षण, व्यवस्थापन व नियंत्रण;
(ख) कायमस्वरूपी सार्वजनिक अभिलेख, विहित करण्यात येईल अशा कालावधीनंतर, ठेव म्हणून स्वीकारणे ;
(ग) सार्वजनिक अभिलेखांचा ताबा, वापर आणि ते काढून घेणे ;
(घ) सार्वजनिक अभिलेखांची मांडणी, जतन आणि प्रदर्शन;
(ङ) सार्वजनिक अभिलेखांची वस्तुसूची, निर्देशांक, सूची आणि इतर संदर्भ माध्यमे तयार करणे ;
(च) अभिलेख व्यवस्थापन पद्धत सुधारण्यासाठी मानके, कार्यपद्धती आणि तंत्रे यांचे विश्लेषण करणे, विकास करणे, चालना देणे आणि समन्वयन करणे;
(छ) पुराभिलेख विभागातील आणि अभिलेख-निर्मिती अभिकरणाच्या कार्यालयांतील सार्वजनिक अभिलेखांचे परिरक्षण, मांडणी आणि सुरक्षा यांची सुनिश्चिती करणे ;
(ज) सार्वजनिक अभिलेखांचे जतन करण्याच्या उद्देशाने उपलब्ध जागेचा वापर आणि सामग्रीचे परिरक्षण करण्यास चालना देणे;
(झ) अभिलेखांचे संकलन, वर्गीकरण आणि विल्हेवाट करण्यावर तसेच अभिलेख व्यवस्थापनाची मानके, कार्यपद्धती आणि तंत्रे लागू करण्यावर अभिलेख-निर्मिती अभिकरणांना सल्ला देणे;
अभिलेख वर्गीकरण करणे अ , ब, क, ड यादीत सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक २३-११-२०००
"अ" वर्ग :-अनिश्चित काळापर्यंत ठेवावयाचे, ज्या फायलींमध्ये महत्वाच्या प्रश्नांबाबत चर्चा केली आहे किंवा ज्यात महत्वाची पूर्वोदाहरणे ठरणारे आदेश किंवा सर्वसाधारण सूचना अथवा कायम महत्वाचे अधिनिर्णय समाविष्ट आहेत अशा फायलींना हा वर्ग देण्यात येईल.
"ब" वर्ग :-३० वर्षे परिरक्षण करावयाचा अभिलेख वरीलप्रमाणे त्याच प्रवर्गातील परंतु काही दशकानंतर संदर्भासाठी ज्यांची आवश्यकता असणार नाही अशा फायलींना हा वर्ग देण्यात येईल
"क" वर्ग :-पाच वर्षासाठी परिक्षण करावयाचा अभिलेख दुय्यम महत्वाच्या व ज्या फायली काही मर्यादित वर्षापर्यंतच ठेवणे इष्ट असते अशा फायलींना हा वर्ग देण्यांत येईल.
"ड" वर्ग :-प्रयोजन पूर्ण झाल्यानंतर ताबडतोब आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये तो अभिलेख ज्या वर्षी फाईल करण्यांत आला असेल ते वर्ष संपल्यानंतर १ वर्षापेक्षा अधिक नाही एवढया मुदतीनंतर नष्ट करावयाचा अभिलेख या वर्गामध्ये केवळ तात्कालीन स्वरुपचे साहित्य असलेल्या फायलींचा समावेश होईल.
You Might Be Interested In
-
576
-
1.1K
-
459
-
1.4K
-
401
-
1.4K
1 comment
अप्रतिम माहितीचे भांडार श्री अजय चौधरी साहेबांनी सर्वांसाठी खुले करून दिलेले आहे ज्ञान आपल्या पुरते न ठेवता इतरांना देखील वाटावे हा सिद्धांत त्यांनी जीवनात अंगीकारल्याचे यावरून दिसून येते त्यांनी अशी बहुमोल माहिती सर्वांना उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे मी मनापासून खूप खूप आभार मानतो व भविष्यात पुढे असेच कार्य त्यांच्याकडून घडत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र