राज्यातील प्रत्येक कार्यालय हे स्वच्छ, सुंदर व नीटनेटके असावे तसेच तेथील वातावरण नागरिकांसाठी सुलभ व कर्मचाऱ्यांसाठी काम करण्यायोग्य, प्रेरक, उत्साहवर्धक असावे यासाठी राज्यस्तर ते तालुका स्तरावर “सुंदर माझे कार्यालय” अभियान पुढील आर्थिक वर्षापासून प्रत्येक वर्षी दि. १ जानेवारी ते ३१ मार्च, १ मे ते ३१ जुलै व १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर अश्या तीन टप्प्यात राबविण्यास संदर्भाधीन शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.
उपरोक्त शासन निर्णयातील परिच्छेद ४ मध्ये या अभियानाची तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावरील पूर्वतयारी, अभियानाची विस्तृत रुपरेषा, अवलंब करावयाची कार्यपध्दती, तसेच अभियानातंर्गत पुरस्काराची निवड करताना विविध स्तरावरील पुरस्कार निवड समित्या, पुरस्कारासाठी विविध स्तरावर विचारात घ्यावयाच्या बाबी व अभियानाची मूल्यांकन पध्दती याबाबत मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यासाठी श्री. सुनील केन्द्रेकर, विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांचे अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात येत आहे. या समितीने या अभियानाबद्दल विस्तृत अहवाल दोन महिन्यात शासनाला (राज्य स्तरीय समितीला) सादर करावा असे नमूद केले आहे.
-
1.1K
-
1.4K
-
1.4K