४. शासन पुढे असेही आदेश देत आहे की, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेल्या गट विमा योजनेतील तरतुदीनुसार बचत निधीमधील रकमेवर दिनांक १ जानेवारी, २०२४ पासून दरसाल दरशेकडा ७.१ टक्के दराने (तिमाही चक्रवाढ होणारे) व्याज आकारण्यात आले आहे. जिल्हा परिषद कर्मचारी गट विमा योजना-१९९० च्या विमा निधीमधील संचित रक्कमांवर दरसाल दर शेकडा ४ टक्के या दरात कोणताही बदल झाला नसल्याने याच दराने विमा निधीमधील संचित रकमांवर व्याजाची आकारणी करण्यात यावी.
उपरोक्त संदर्भाधीन शासन निर्णयातील परिच्छेद क्र. २ मध्ये "माहे जानेवारी, २०१६ या महिन्याची सुधारीत वर्गणीच्या फरकाची रक्कम बिनव्याजी माहे फेब्रुवारी, २०१६ च्या वेतनातून वसूल करण्यात यावी" या ऐवजी "माहे जानेवारी, २०१६ या महिन्याची सुधारीत वर्गणीच्या फरकाची रक्कम बिनव्याजी माहे एप्रिल, २०१६ च्या दिनांक १ मे, २०१६ रोजी देय होणाऱ्या वेतनातून वसूल करण्यात यावी" असे वाचण्यात यावे.
वेबसाइटचा उद्देश :-https://gr.ravindrachavan.in/ मुख्य उद्देश शासकीय निर्णय आणि परिपत्रके यांचा संग्रह एका केंद्रित व्यासपीठावर उपलब्ध करणे हा आहे. यामुळे नागरिक, संशोधक, आणि प्रशासकीय अधिकारी यांना आवश्यक माहिती त्वरित मिळू शकते.
या संकेतस्थळावर दिनांक निहाय व विषयनिहाय शासकीय निर्णय, राजपत्र, आणि इतर महत्वाचे दस्तऐवज डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत, ज्यामुळे नागरिकांना ही माहिती सहज उपलब्ध होते.