घरकुल: मोदी आवास योजना

by GR Team
0 comments 683 views

मोदी आवास घरकुल योजनेत विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गांचा समावेश करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग शासन निर्णय क्रमांक- वगृयो-२०२३/प्र.क्र.३३/योजना-५ मंत्रालय, मुंबई-४०० ०३२. दिनांक:- ३० जानेवारी, २०२४.

राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गासोबतच विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांचा समावेश ‘मोदी आवास’ घरकुल योजनेमध्ये करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

०२. शासन निर्णय इतर मागास बहुजन कल्याण विभाग क्र. वगृयो-२०२३/प्र.क्र.३३/योजना-५ दि.२८.०७.२०२३ मधील नमुद अटी व शर्ती विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांनाही लागू राहतील.

०३. सदर योजनेतंर्गत लाभ घेणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर घरकुल योजनेंचा लाभघेतलेला नसावा.

०४. मा. मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या मान्यतेस अनुसरुन सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

. संकेताक २०२४०२०११२१२१६६४३४

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

वेबसाइटचा उद्देश :-https://gr.ravindrachavan.in/ मुख्य उद्देश शासकीय निर्णय आणि परिपत्रके यांचा संग्रह एका केंद्रित व्यासपीठावर उपलब्ध करणे हा आहे. यामुळे नागरिक, संशोधक, आणि प्रशासकीय अधिकारी यांना आवश्यक माहिती त्वरित मिळू शकते. 

या संकेतस्थळावर दिनांक निहाय व विषयनिहाय शासकीय निर्णय, राजपत्र, आणि इतर महत्वाचे दस्तऐवज डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत, ज्यामुळे नागरिकांना ही माहिती सहज उपलब्ध होते.

© 2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept

Privacy & Cookies Policy