Home कर्मचारी हितार्थसंकीर्ण गणेशोत्सव हा “राज्य महोत्सव” म्हणून साजरा करणेबाबत.

गणेशोत्सव हा “राज्य महोत्सव” म्हणून साजरा करणेबाबत.

by GR Team
0 comments 871 views

गणेशोत्सव हा “राज्य महोत्सव” म्हणून साजरा करणेबाबत.
महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शासन निर्णय क्रमांक- पुलदे-२०२५/प्र.क्र.११४(१२५५४१२)/सां.का.२ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-३२. दिनांक: १४ ऑगस्ट, २०२५


राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव हा "राज्य महोत्सव" म्हणून साजरा करण्याबाबतचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. या अनुषंगाने राज्यातील गणेशोत्सवानिमित्त अधिकाधिक व्यक्ती, संस्था आणि विविध समाजघटकांना सामाजिक सलोख्यासाठी एकत्रित आणणे, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर साजऱ्या होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवास प्रोत्साहन देणे, विविध सांस्कृतिक विषयांचे जतन व संवर्धन करणारे उपक्रम उदा. विविध स्पर्धा, व्याख्यानमाला इ. आयोजित करणे, महाराष्ट्रात शिकणाऱ्या परदेशातील तसेच अन्य राज्यांतील विद्यार्थ्यांना या राज्य उत्सवात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे इ. उपक्रमांसह, गणेशोत्सव हा 'राज्य महोत्सव' म्हणून साजरा करण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

५. उपरोक्त परिच्छेदामध्ये दर्शविण्यात आलेल्या कार्यक्रमांच्या/उपक्रमांच्या संदर्भात आवश्यक असलेला खर्च हा संबधित कार्यालयांनी त्यांना सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात उपलब्ध असलेल्या निधीतून भागवावा..
६. सर्व जिल्हाधिकारी यांनी गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा व्हावा यासाठी सदर शासन निर्णयात नमूद करण्यात आलेल्या कार्यक्रम/उपक्रमांच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करावी.
संगणक संकेतांक क्रमांक २०२५०८१४१७२९०९३६२३ अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

https://gr.ravindrachavan.in/ ही महाराष्ट्र शासनाशी संबंधित शासकीय निर्णय (Government Resolutions – GR) आणि परिपत्रके (Circulars – CR) यांची माहिती विषयनिहाय माहिती उपलब्ध करणारे एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. या वेबसाइटचे मुख्य उद्दिष्ट शासकीय अधिकारी, कर्मचारी,नागरिकांना शासकीय धोरणे, नियम, आणि योजनांबाबत अद्ययावत आणि परिपूर्ण माहिती प्रदान करणे आहे.

पारदर्शकता:- शासकीय निर्णय आणि परिपत्रके थेट शासकीय संकेतस्थळावरून प्राप्त करून घेतलेली असल्याने त्यात कोणताही बदल केलेला नाही असे वेबसाइट स्पष्टपणे नमूद करते. तसेच ह्या संकेतस्थळाचा कोणताही व्यावसायिक हेतु नाही.

You may also like

Leave a Comment

About Us

वेबसाइटचा उद्देश :-https://gr.ravindrachavan.in/ मुख्य उद्देश शासकीय निर्णय आणि परिपत्रके यांचा संग्रह एका केंद्रित व्यासपीठावर उपलब्ध करणे हा आहे. यामुळे नागरिक, संशोधक, आणि प्रशासकीय अधिकारी यांना आवश्यक माहिती त्वरित मिळू शकते. 

या संकेतस्थळावर दिनांक निहाय व विषयनिहाय शासकीय निर्णय, राजपत्र, आणि इतर महत्वाचे दस्तऐवज डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत, ज्यामुळे नागरिकांना ही माहिती सहज उपलब्ध होते.

© 2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept

Privacy & Cookies Policy