Home उद्योग विभाग महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 1948

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 1948

by GR Team
0 comments 267 views

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ या अधिनियमातील आस्थापना नोंदणी व सूचना दिल्याची पावती अर्जामधील माहिती कमी करणे, अर्जदाराकडून घेण्यात येणारी कागदपत्रे कमी करणे व नागरीकांना / अर्जदारांना सेवा अधिक सुलभपणे देणेबाबत. उद्योग, उर्जा व कामगार विभाग 28-03-2026

शासनामार्फत पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवांची GPR (Governance Process Reengineering) प्रक्रिया पुर्नबांधणी या विषयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत कामगार विभागामार्फत देण्यात येणारी महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ मधील आस्थापनांची नोंदणी व सूचना दिल्याची पावती या सेवा घेण्यात आलेल्या आहेत.
२. त्याअनुषंगाने GPR (Governance Process Reengineering) अंतर्गत महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ या अधिनियमातील आस्थापना नोंदणी व सूचना दिल्याची पावती अर्जामधील माहिती कमी करणे, अर्जदाराकडून घेण्यात येणारी कागदपत्रे कमी करणे व नागरीकांना / अर्जदारांना सेवा अधिक सुलभपणे देता यावी, याकरीता महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) नियम, २०१८ मधील नियम ५ (२) मध्ये तसेच अर्जाचा नमुना-अ व नमुना-फ मध्ये तसेच परिशिष्टामधील भाग-अ व भाग-क मध्ये बदल करण्यात आला आहे.

अधिक माहिती साठी पीडीएफ download करून घ्यावी.

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ या अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणीबाबत. उद्योग, उर्जा व कामगार विभाग 01-10-2025

अ) महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७च्या कलम १६ (१) (ख) मध्ये आस्थापना आठवडयातील सर्व दिवस धंदा करण्यास खुल्या ठेवता येतील, मात्र तेथील प्रत्येक कर्मचा-यास आठवडयातून चोवीस तास सलग विश्रांती मिळेल, अशी साप्ताहिक सुटी देण्यात येईल, अशी तरतूद आहे. तसेच कलम २ (२) मध्ये “दिवस” याचा अर्थ, मध्यरात्रीपासून सुरु होणारा चोवीस तासांचा कालावधी, असा आहे, अशी व्याख्या आहे. त्यामुळे उपरोक्त कलम १६ (१) (ख) मधील तरतुदीस अधीन राहून मद्य पुरवठा/विक्री करणा-या आस्थापना वगळून इतर आस्थापना २४ तास सुरु ठेवता येतील.
आ) तथापि, शासनाने दिनांक १९/१२/२०१७ रोजीच्या अधिसूचनेन्वये राज्यातील विविध क्षेत्रातील मद्य विक्री व मद्य पुरविणा-या आस्थापनांच्या उघडण्याच्या व बंद करण्याच्या वेळा निश्चित केलेल्या असल्यामुळे, अशा आस्थापना २४ तास सुरु ठेवता येणार नाहीत.

अधिक माहिती साठी पीडीएफ download करून घ्यावी.

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन), अधिनियम, 2017 नुसार नोंदणी प्रमाणपत्राचे नुतनीकरण करण्याची आवश्यकता काढून टाकण्याबाबत. उद्योग, उर्जा व कामगार विभाग 02-03-2019

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन), अधिनियम, २०१७ च्या कलम ४ मध्ये शासनास या अधिनियमातील कोणत्याही आस्थापनेस किंवा कोणत्याही वर्गवारीतील आस्थापनांना किंवा कामगारांना किंवा व्यक्तींना कोणत्याही तरतूदीतून सूट देण्याचे अधिकार आहेत. उक्त अधिनियमाच्या उपरोक्त कलम ४ (१) च्या तरतूदीन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन, या अधिनियमाच्या कलम ६ अन्वये नोंदित करण्यात येणा-या सर्व आस्थापनांना दहा वर्षांनी नोंदणी प्रमाणपत्राचे नुतनीकरण करण्याच्या तरतूदीतून सूट देण्यात येत आहे. त्यानुसार महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन), अधिनियम, २०१७ अधिनियमाच्या कलम ६ अन्वये नोंदित सर्व आस्थापनांना नोंदणी प्रमाणपत्राचे नुतनीकरण करण्याची आवश्यकता यापुढे राहणार नाही.

अधिक माहिती साठी पीडीएफ download करून घ्यावी.

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, 2017 अंतर्गतच्या (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) नियम, 2018 नुसार आस्थापनेचा नोंदणी दाखला एक दिवसात देण्यासंदर्भात. उद्योग, उर्जा व कामगार विभाग 28-02-2019

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ च्या कलम ६(२) अन्वये अर्जदाराने नोंदणी दाखला घेण्याकरिता विहित नमुन्यात परिपूर्ण भरलेला अर्ज व महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) नियम, २०१८ मधील अनुसूचीमध्ये दर्शविलेल्या आवश्यक त्या कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज ऑनलाईन सादर केल्यानंतर व तो सुविधाकाराच्या डॅशबोर्डवर प्राप्त झालेल्या दिनांकापासून कार्यालयीन कामकाजाच्या एका दिवसात तो मंजूर करुन नोंदणी दाखल्याच्या नमुना “ब” मध्ये असलेल्या नोंदणी दाखल्यावर डिजिटल स्वाक्षरी करण्यात यावी. सुविधाकाराने आवश्यक ती कागदपत्र व

परिपूर्ण असलेला नोंदणी दाखल्याचा अर्ज एका दिवसात निकाली काढावा. सदर अर्ज ऑनलाईन प्रणालीव्दारे स्वयं-घोषणापत्र व स्वयं साक्षांकित केलेल्या कागदपत्रांच्या आधारे देण्यात यावा. नोंदणी दाखला देण्यापूर्वी निरीक्षण करण्याची तरतूद अधिनियमात नाही. त्यामुळे दुकाने व आस्थापनेचा नोंदणी दाखला देण्यापूर्वी सुविधाकाराने सदर आस्थापनेचे निरीक्षण करण्याची आवश्यकता नाही.

अधिक माहिती साठी पीडीएफ download करून घ्यावी.

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम, 1948 अंतर्गतच्या नियम, 1961 मधील आस्थापनेची नोंदणी दाखल्याचे नुतणीकरण एक दिवसात देण्यासंदर्भात अंमलबजावणी करणेबाबतची कार्यपध्दती. उद्योग, उर्जा व कामगार विभाग 25-10-2017

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम, 1948 अंतर्गतच्या नियम, 1961 मधील आस्थापनेची नोंदणी दाखला व नुतणीकरण एक दिवसात देण्यासंदर्भात अंमलबजावणी करणेबाबतची कार्यपध्दती. उद्योग, उर्जा व कामगार विभाग 28-06-2017

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 1948, अंतर्गतच्या नियम 1961 मधील नोंदणी व नुतनीकरणासंदर्भात अंमलबजावणी करणेबाबतची कार्यपद्धती.उद्योग, उर्जा व कामगार विभाग 24-06-2016

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 1948, अंतर्गतच्या नियम 1961 मधील नोंदणी व नुतनीकरणासंदर्भात अंमलबजावणी करणेबाबतची कार्यपद्धती.उद्योग, उर्जा व कामगार विभाग 18-05-2015

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम,1948 मधील कलम 4 अन्वये अधिनियमाच्या तरतुदींमधून सुट देण्याची कार्यपध्दती सुटसुटीत करण्याबाबत. उद्योग, उर्जा व कामगार विभाग 11-07-2013

About Us

वेबसाइटचा उद्देश :-https://gr.ravindrachavan.in/ मुख्य उद्देश शासकीय निर्णय आणि परिपत्रके यांचा संग्रह एका केंद्रित व्यासपीठावर उपलब्ध करणे हा आहे. यामुळे नागरिक, संशोधक, आणि प्रशासकीय अधिकारी यांना आवश्यक माहिती त्वरित मिळू शकते. 

या संकेतस्थळावर दिनांक निहाय व विषयनिहाय शासकीय निर्णय, राजपत्र, आणि इतर महत्वाचे दस्तऐवज डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत, ज्यामुळे नागरिकांना ही माहिती सहज उपलब्ध होते.

© 2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept

Privacy & Cookies Policy