पोलीस कोठडीतील मृत्यू (Custodial Death) प्रकरणांच्या तपासाबाबत मार्गदर्शक नियमावली तसेच पोलीस कोठडीतील मृत्यू (Custodial Death) होऊ नये याकरिता घ्यावयाची दक्षता गृह विभाग 28-07-2026 अधिक माहिती साठी पीडीएफ download करून घ्यावी.
गुन्हे अन्वेषण विभाग येथे, पोलीस कोठडी मृत्यू संदर्भात BNSS, २०२३ चे कलम १९४ (१) / CrPC, १९७३ चे कलम १७४ (१) अन्वये तपासाकरीता दाखल प्रकरणांमध्ये तपासी अधिकारी यांनी अंतिम समरी / अंतिम अहवाल (Closure Report) इन्क्वेस्ट करण्याचे अधिकार असलेल्या दंडाधिका-याकडे (जिल्हा दंडाधिकारी, उपविभागिय दंडाधिकारी व राज्य शासनाने किंवा जिल्हा दंडाधिका-याने या संबंधात विशेष अधिकार प्रदान केलेला अन्य कोणताही कार्यकारी दंडाधिकारी) मंजूरीसाठी पाठविण्यापूर्वी न्यायदंडाधिकारी यांचेकडून चौकशी अहवाल प्राप्त करावा व त्याच्यातील निष्कर्ष लक्षात घेवूनच अंतिम अहवाल (Closure Report) सादर करावा.
अधिक माहिती साठी पीडीएफ download करून घ्यावी.
पोलीस कोठडीतील मृत्यु संदर्भात करावयाची कार्यवाही. गृह विभाग 20-02-2018 अधिक माहिती साठी पीडीएफ download करून घ्यावी.
१) एखादया गुन्हयातील आरोपीतास अटक करतांना त्याचा अटक पंचनामा तयार करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्याने आरोपीताचे बाहय अंग/शरीर नीट तपासून/पारखून घ्यावे व आरोपीताच्या शरीरावर दिसणाऱ्या सर्व जखमांचा तपशील अटक पंचनाम्यात काटेकोरपणे नमुद करावा.
अधिक माहिती साठी पीडीएफ download करून घ्यावी.
२) आरोपीतास अटक करतांना त्याची अंग झडती घेण्यात यावी. आरोपीस पोलीस कोठडीत ठेवण्यापूर्वी आणि त्यास कोर्टात हजर करुन किंवा तपासाकरीता बाहेर नेल्यानंतर पुन्हा पोलीस कोठडीत ठेवण्यापूर्वी आरोपीताची/कैदयाची कसून झडती घेतल्याशिवाय त्यास पोलीस कोठडीत ठेवण्यात येऊ नये. झडतीदरम्यान त्याच्याकडे मारक हत्यार, विषारी पदार्थ, दोरी व तत्सम वस्तु, ब्लेड, काडीपेटी, चाकू इत्यादी प्रकारच्या अन्य वस्तु आढळल्यास अशा वस्तु आरोपीतास पोलीस कोठडीत ठेवण्यापूर्वीच काढून घेण्यात याव्यात.
३) अटक केलेल्या व पोलीस कोठडी देण्यांत आलेल्या आरोपीस दुखापत झाल्याचे आढळल्यास त्यास जवळच्या रुग्णालयात नेऊन आवश्यक ती वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यांत यावी व आरोपीच्या दुखापतीबाबत रुग्णालयातील वैद्यकीय अहवाल रुग्णालयाच्या तसेच पोलीसांच्या अभिलेखावर जतन करण्यांत यावा.
४) आरोपी जोपर्यंत पोलीस कोठडीत राहील तोपर्यंत दर ४८ तासांनी त्या आरोपीची वैद्यकीय तपासणी करुन त्याची नोंद संबंधित नोंदवहीत न चुकता घ्यावी.
५) पोलीस ठाण्यातील पोलीस कोठडीच्या बाहेर CCTV यंत्रणा बसविण्यात यावी व त्यामधील अभिलेख पुढील तीन महिन्यांच्या कालावधीसाठी जतन करण्यात यावा.
६) पोलीस कोठडीमधील आरोपीच्या माहिती भेटीचा वृतान्त नोंद करुन ठेवण्यात यावा. पोलीस ठाण्यातील पोलीस कोठडीमधील आरोपींसंदर्भात पोलीस ठाणे अंमलदाराने अद्ययावत नोंदी ठेवाव्यात.
७) आरोपीस चौकशीसाठी चौकशी खोलीमध्ये नेताना तपासी अधिका-याने ठाणे अंमलदार/पोलीस ठाणे प्रमुख (S.H.O.) यांना तसे कळवावे व तशी नोंद पोलीस ठाणे दैनंदिनीमध्ये व लॉकअप रजिष्टरमध्ये घेण्यात यावी.
८) चौकशी कामी/तपास कामी पोलीस कोठडीतील आरोपीतास बाहेर घेऊन जाण्यात आले तर त्याबाबतची सविस्तर नोंद पोलीस ठाणे दैनंदिनीमध्ये (G.D.) घेण्यात यावी. त्याप्रमाणे सदरची बाब उप विभागीय पोलीस अधिकारी (S.D.P.O) यांच्याकडे पाठविण्यात येणा-या दैनिक अहवालामध्ये सुध्दा नमुद करण्यात यावी.
पोलीस/न्यायालयीन कोठडीतील मृत्यू. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 176 अन्वये कार्यवाही संदर्भात कार्यपध्दती. गृह विभाग 10-01-2017 अधिक माहिती साठी पीडीएफ download करून घ्यावी.