जन्म मृत्यू नोंदणी शासन निर्णय

by GR Team
0 comments 5.5K views

जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम १९६९ [THE REGISTRATION OF BIRTH AND DEATHS ACT 1969] for download CLICK HERE

महसूल व वन विभाग शासन परिपत्रक दिनांक : १ डिसेंबर, २०२५ अवैध विलंबित जन्म-मृत्यू नोंदी रद्द करुन प्रमाणपत्र परत मिळविण्याबाबतची कार्यपध्दती व कालबध्द कार्यक्रम मार्गदर्शक सूचना

महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय -०१ दिनांक: १६ सप्टेंबर, २०२५ अवैध विलंबित जन्म-मृत्यू नोंदी रद्द करुन प्रमाणपत्र परत मिळविणेबाबतची कार्यपध्दती व कालबध्द कार्यक्रम

दिनांक 12-03-2025 जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम,1969 व सुधारणा अधिनियम, 2023 अन्वये विलंबाने करावयाच्या जन्म-मृत्यू नोंदीबाबतची काययपध्दती निश्चित करणे बाबत.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी.

मुस्लिम धर्मियांमधील दत्तक बालकाच्या जन्म नोंदणी बाबत दिनांक ०९/०७/2019

मुस्लिम धर्मियामधील दत्तक बालकांच्या जन्म नोंदणीबाबत या कार्यालयाकडून केंद्र शासनास विचारणा करण्यात आली होती. याबाबत मार्गदर्शक सूचना केंद्र शासनाच्या संदर्भिय पत्रान्वये कळविण्यात आल्या आहेत.
या मार्गदर्शक सूचना आपण आपल्या कार्यक्षेत्रातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व निबंधक, जन्म व नौदणी मृत्यू यांना कळवाव्यात. या पत्रासोबत संदर्भिय पत्राची छायांकित प्रत जोडण्यात आली आहे.

FULL NAME OF CHILD IN BIRTH CERTIFICATE दिनांक 24-08-2018

राज्यातील शासकीय आरोग्य संस्था मध्ये संस्था प्रमुखांना निबंधक जन्म मृत्यू नियुक्त करणे बाबत दिनांक ०१-६-२०१८

केंद्र शासनाच्या मान्यतेने यापूर्वी निर्गमित केलेल्या सर्व अधिसूचना/आदेश यांना अधिक्रमित करुन जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम १९६९ मधील कलम ७ (१) अन्वये महाराष्ट्र शासनाने सोबतच्या सुधारित अनुसूचीप्रमाणे “निबंधक जन्म-मृत्यू” म्हणून नेमणूका केल्या आहेत या संदर्भातील अधिसूचना दिनांक १२ एप्रिल २०१८ रोजी निर्गमित केलेली आहे.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी.

जन्म मृत्यू उशिरा नोंद दिनांक २६-०४-२०१८

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

संस्थेकडून होणाऱ्या दत्तक विधान कार्याबाबत दिनांक २६-०२-२०१८

१) संस्थेद्वारा जे दत्तक विधान करण्यात्त येणार नाही अशा प्रकरणात दत्तक बालकाचा न्यायालयाकडील दत्तक आदेश जन्म नोंदणीसाठी यापुढे आवश्यक नाही, मात्र प्नोंदणीकृत दत्तक विधान सादर करणे बंधनकारक आहे. (केंद्र शासनाच्या दिनांक १५/०५/२०१५ च्या परिपत्रकानुसार) २) संस्थेव्दारा जे दत्तक विधान करण्यात येईल, अशा प्रकरणात केवळ न्यायालयांकडील दत्तक आदेश जन्म नोंदणीसाठी/दुरुस्तीसाठी पुरेसा आहे, नागरीकांकडे दत्तक विधान (Adoption deed) दस्तऐवज सादर करण्याबाबत आग्रह धरु नये

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

BIRTH & DEATH दिनांक 31-01-2018

मृत्यू नोंदणीसाठी आधार कार्ड ऐच्छिक असल्या बाबत दिनांक 0२-१२-२०१७

मा. महानिबंधक जन्म-मृत्यू नोंदणी केंद्रिय गृह मंत्रालय यांची LARIFICATION/INTERPRETATION. १/१२/२०१४/व्हीएस-सीआरएस, नवी दिल्ली, दि ८/०९/१७मृत्यु घटनांच्या नोंदणीकरीता आधार नोंदणी ऐच्छिक करण्याबाबत कळविलेले आहे. (

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

मृत्यू नोंदणीसाठी आधार कार्ड आवश्यक असल्या बाबत दिनांक २२-०९-२०१७

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

जन्म मृत्यू नोदणी व जीवनाविषयक आकडेवारी बाबत विविधस्तरावरील समित्याचा सभाचा अहवाल सन २०१६ व सन २०१७ बाबत मा संचालक, क्र संआसे/जन्म-मृत्यू/कक्ष-१८ ९६२४-९७९८/१७ दि २०-६-१७

आरोग्य संस्थेमधील जन्म मृत्यू प्रमाणपत्र देण्याबाबत स्पस्टीकरण      म उपसंचालक, आ से (आमाजीआ) तथा उपमुख्य निबंधक जन्म- मृत्यू पुणे ६ दि २९/११/२०१६

जन्म नावात बदल 24-11-2016

६) वरील प्रमाणे चुका, आईवडिलांचे नाव नोंदविताना किंवा अडनाव लिहीताना होण्याची शक्यता असते. अशा चुका योग्य शासकिय पुरावे, प्राप्त झाल्यावर व निबंधकाची त्याच्या सत्यतेबाबत खात्री पटल्यावर त्यात कलम १५ व नियम ११ अन्वये चुक दुरुस्ती करता येऊ शकते.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी.

संस्थेने दत्तक घेतलेल्या  बालकाचे जन्म प्रमाणपत्रात जन्माचे ठिकाण नोंद करणेबाबत स्पस्टीकरण   म उपसंचालक, आ से (आमाजीआ) तथा उपमुख्य निबंधक जन्म- मृत्यू पुणे जाक्र आमजीआ/कक्ष-८३/जन्म ठिकाण/११८८०-११९५० /१६  दि २१/१० /२०१६

महाराष्ट्र जन्म मृत्यू नोंदणी नियम (पहिली सुधारणा ) दिनांक 23-09-2016

१) दत्तक वालकासाठी जन्म नोंदणीचा नमुना क्रं १ अ चा समावेश
२) मृत्यू नोंदणी मध्ये पती/पत्नी (जोडीदार) यांच्या नावाचा समावेश
३) जन्म-मृत्यू नोंदणी मध्ये आधार क्रंमाकाचा समावेश
४) जन्म मृत्यू नोंदणी करताना लिंग या रकान्यात ” पुरुष किंवा स्त्री “ऐवजी ” पुरुष किंवा स्त्री किंवा तृतीय लिंगी “यांचा वापर करणे.
वर नमुद केलेली माहिती प्राप्त होण्यासाठी महाराष्ट्र जन्म मृत्यू नोंदणी नियम २००० मधील विहीत नमूने (१,१अ, २, ३,५व ६) मध्ये याबाबी समावेश करुन महाराष्ट्र शासनाने दिनांक १४ जुलै २०१६ अन्वये, अधिसूचना निर्गमित केलेली आहे.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

म उपसंचालक, आ से (आमाजीआ) तथा उपमुख्य निबंधक जन्म- मृत्यू पुणे कडील पत्र दि १९/७/२०१६ चालत्या वाहनातील तसेच १०८ अंबुलन्स मध्ये घडणाऱ्या मृत्यू घटनाच्या नोंदणीबाबत स्पस्टीकरण    

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम २००० मधील नियम ७ च्या बदली सार्वआवि क्र जमृनो२००३/१३६२/प्रक्र २९७/ कु क ३ दि १४ jully २०१६ 

Explanation regarding birth-death cer issued med insti दिनांक 24-02-2016

म उपसंचालक, आ से (आमाजीआ) तथा उपमुख्य निबंधक जन्म- मृत्यू पुणे कडील पत्र दि ४/१/२०१६ जन्म मृत्यू नोंदणी करतांना लिंग या रकान्यातील नोंदणी बाबत

म उपसंचालक, आ से (आमाजीआ) तथा उपमुख्य निबंधक जन्म- मृत्यू पुणे कडील पत्र दि १७/११/२०१५ जन्म नोंद वहीत बाळाचे नाव व जन्म तारीख मधील दुरुस्ती बाबत    

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

दिनांक०८/१०/२०१५ नोंदणी केंद्र उघडणे / सरकारी रुग्णालयात केंद्र असणे बाबत

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

म उपसंचालक, आ से (आमाजीआ) तथा उपमुख्य निबंधक जन्म- मृत्यू पुणे कडील पत्र दि २५/८/२०१एक पालक/अविवाहित माता यांचा बालकाच्या जन्म नोंदणी संदर्भात मा. सर्वोच्च न्यायालायचा निर्णयाबाबत  

१) मा. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे निर्णयात जर एक पालक/अविवाहीत मातेने तिच्या गर्भाशयातून जन्मलेल्या बालकाचे जन्म प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केला असल्यास संबंधितांचे अॅफीडयूट घोषणापत्र प्राप्त करुन घेऊन जन्म नोंद घेऊन एका पालकाचे नावे जन्म दाखला वितरीत करता येईल. अशा प्रकरणात न्यायालयाने काही आक्षेप नमूद केले असल्यास एक पालक/अविवाहीत माता यांना जन्म प्रमाणपत्र देता येणार नाही.

२) एकाही एक पालक/अविवाहीत मातांना जन्म प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करणे/नाकारले जाणार नाही याची दक्षता घ्यावी. अशा प्रकरणामध्ये जन्म दाखल्यात एका पालकाचे नाव लिहावे व दुसरे पालकांच्या नावाची जागा मोकळी ठेवावी. कांहीही लिहिन्यात येऊ नये. या संदर्भात कोर्टाने सूचित केलेली आवश्यक कागदपत्रे कायम स्वरुपी अभिलेख म्हणून नमुना क्रं. १ (कायदेशीर भाग) सोबत जतन करुन ठेवावी.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

Correction in name and date of birth of the child in birth record clarification sought      DIRECTORATE of HEALTH SERVICES मुंबई no DHS/MIS-CELL/D-१८/CRS/CORRECTION /३७०६-०७ दि ५/८/२०१५

म उपसंचालक, आ से (आमाजीआ) तथा उपमुख्य निबंधक जन्म- मृत्यू पुणे कडील पत्र दि ३१/७/१५ एक पालक/अविवाहित माता यांचा बालकाच्या जन्म नोंदणी संदर्भात मा. सर्वोच्च न्यायालायचा निर्णयाबाबत 

दत्तक बालकाच्या नोंदणी बाबत    मा संचालक, आसे मुंबई क्रसआसे/ एमआयएस/ मद पालक/अविमाजनो/ कक्ष१८/ ३६८९-९०/२०१५ दि ३१/७/२०१५

जन्म नोंदणी बाळाचे नाव समाविष्ठ करणेबाबत   म उपसंचालक, आ से (आमाजीआ) तथा उपमुख्य निबंधक जन्म- मृत्यू पुणे जाक्र आमजीआ/कक्ष-८३/नाव समाविष्ठ/अधिसूचना /४९७६-५११२ /१५ दि २७/७/२०१५

भारत सरकार, गृह मंत्रालय, परिपत्रक कडील पत्र दि २७/७/२०१५ Aceeptance of the birth /death certificate issed through CRS application reg     

१) ज्या नागरिकांच्या मुलाच्या जन्माची नावाशिवाय नोंदणी १.१.२००० पूर्वी झालेली आहे व ज्यांच्या नोंदणीला १५ वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. अशा सर्व नागरिकांना या संधीचा लाभ देण्यात येत आहे या मध्ये सन १९६९ पुर्वीच्या नोंदणीचा सुध्दा समावेश आहे.
२) संबंधित व्यक्ती अथवा त्यांचे पालक यांचा बाळाचे नाव समाविष्ट करणेबाबतचा अर्ज घेण्यात यावा.
(έनावाच्या शाबीतीकरिता कुठलाही एक शासकिय पुरावा उदा. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, एस. एस.सी. प्रमाणपत्र, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड इ. ची प्रत घेण्यात यावी.
) बाळाचे संपूर्ण नाव लिहिण्याबाबत आग्रह धरण्यात यावा. उदा. राम नामदेव दामले.
४ ५) बाळाचे नाव समाविष्ट झालेनंतर ते नाव बदलता येत नाही याची कल्पना नागरिकांना देण्यात यावी व तसा फलक दर्शनीय भागावर लावण्यात यावा.
६) काही धर्मांमध्ये आई-वडिल यांचे आडनावापेक्षा बाळाचे आडनाव वेगळे ठेवण्याची प्रथा असते तसेच बाळाचे मधले नाव वडिलांच्या नावा पेक्षा वेगळे असते अशा प्रकरणांत संबंधितांनकडून अर्जामध्ये तसा स्पष्ट उल्लेख नमूद करुन घेण्यात यावा.
७) बाळाचे नाव जन्म नोंदणीत समाविष्ट केले नंतर शेरा रकान्यात या परिपत्रकाचा संदर्भ, क्रमांक व दिनांक नमूद करुन निबंधक/उपनिबंधक जन्म-मृत्यु यांनी स्वाक्षरी करुन दिनांक नमूद करावा. व नावासह सुधारीत जन्म दाखला वितरीत करण्यात यावा.
८) जन्म नोंदणीत बाळाचे नाव समाविष्ठ करण्याबाबतचा अर्ज जन्म अहवाला सोबत कायमस्वरुपी जतन करण्यात यावेत.
९) नागरीकांना नांव नोंदवून घेण्यासाठी प्रवृत्त करावे.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

म उपसंचालक, आ से (आमाजीआ) तथा उपमुख्य निबंधक जन्म- मृत्यू पुणे कडील पत्र दि ३०/६/२०१५ उशिरा नोंदणी बाबतचे अधिकार संबाधित क्षेत्रातील प्रथम वर्ग न्याय दंडधिकारी किंवा महानगर दंडाधिकारी यांना असल्याबाबतच्या अधिसुचनेबाबत  

दत्तक घेतलेल्या बालकांच्या जन्म अहवालामध्ये जन्म नोंद घेणे बदल करणे बाबत दि ११/०६/२०१५

म उपसंचालक, आ से (आमाजीआ) तथा उपमुख्य निबंधक जन्म- मृत्यू पुणे कडील पत्र दि ११/६/२०१५ दत्तक घेतलेल्या बालकांच्या जन्म अहवालामध्ये जन्म नोंद घेणे / बदल करण्याबाबत मार्गदर्शन     


दत्तक आदेश प्राप्त करुन घेण्यासाठी नातेवाईक व सामान्य नागरीकांना येणा-या अडचर्णी बाबत केंद्र स्तरावर आढावा घेण्यांत आला व त्याबाबत महिला व बाल विकास विभाग मंत्रालयाच्या Central Adoption Resource Authority (CARA) यांचेशी झालेल्या चर्चनुसार घेण्यात आलेल्या निर्णया प्रमाणे देशात संस्थे व्यतिरिक्त नातेवाईक किंवा इतर ओळखीच्या संबंधामध्ये होणा-या दत्तक प्रक्रियेमध्ये यांच्या दत्तक नोंदणीसाठी ‘नोंदणीकृत दत्तक विधान’ पुरेसे आहे. अशा प्रकरणामध्ये न्यायालयीन दत्तक आदेश देण्याची आवश्यकता नाही.
अर्थात जन्म नोंदणी अहवालामध्ये जन्म नोंद घेणे/बदल करताना निबंधक जन्म-मृत्यू यांनी ‘दत्तक विधान’ बरोबर असल्याचे तपासून ‘दत्तक विधान’ राज्य शासनाने प्राधिकृत केलेल्या उपनिबंधकाकडे नोंदविले असल्याची खात्री करावी. त्या नंतर आवश्यक ते बदल दत्तक विधानात दिलेल्या माहितीच्या आधारे जन्म अहवालात दत्तक आई-वडीलांचे व बालकाच्या नावाची नोंद घेऊन जन्म प्रमाणपत्र वितरीत करावे.
संस्थे बाहेरील इतर दत्तक प्रकरणी दत्तक बालक व पालकाचे नांव नोंदविण्यास जर एक वर्षपिक्षा अधिक कालावधी झाला नसेल व त्यांची नोंद जन्म नोंदवहीत आढळली नसल्यास अशा बाबतीत जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम १९६९ कलम (१३) (३) नुसार उशिरा नोंदणीची प्रक्रिया अवलंबून वर्ग-१ न्याय दंडाधिकारी यांचे आदेश प्राप्त करुन घ्यावेत व त्यानंतर संबंधित घटनेची नोंद जन्म अहवालात घेण्यात यावी.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

म उपसंचालक,आ से (आमाजीआ) तथा उपमुख्य निबंधक जन्म-मृत्यू पुणे कडील पत्र दि २/६/२०१५ जन्म प्रमाणपत्रावर दत्तक विधान झाल्याची कोर्ट ओर्डेर डेट व कौर्ट ओर्डेर चा क्रमांक याचा शेरा रकान्यांमध्ये उल्लेख न करणेबाबत      

दत्तक घेतलेल्या बालकाची नोंद करताना शेरा रकान्यात न्यायालयीन आदेशाची क्रमांक व तारीख इ. माहिती नमूद करणे आँवश्यक आहे. त्यानंतर दत्तक घेतलेल्या आई-वडीलांच्या नावाने नवीन सुधारीत जन्म प्रमाणपत्र अदा करावे.

केंद्रिय दत्तक ग्रहण संसाधन प्राधिकरण भारत सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालय अंतर्गत नवी दिल्ली याच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार दत्तक घेतलेल्या बालकाचे जन्म प्रमाणपत्रावर दत्तक असल्याचा तसेच कोर्ट आदेश इ. बाबींचा शेरा रकान्यात अथवा इतरत्र उल्लेख केला जाणार नाही याची कृपया दक्षता घ्यावी.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

सा आ वि अधिसूचना दि १५/५/२०१५ गर्भधारणपूर्व व प्रसवपूर निदान तंत्र (लिग निवडीस प्रतिबंध अधिनियम १९९४  

म उपसंचालक,आ से (आमाजीआ) तथा उपमुख्य निबंधक जन्म-मृत्यू पुणे दि १३/५/२०१५ जन्म मृत्यू घटनांची नोदणी व प्रमाणपत्र वाटपाबाबत अनियमीतता व भ्रष्ट कार्यप्रणाली बाबत

म उपसंचालक, आ से (आमाजीआ) तथा उपमुख्य निबंधक जन्म- मृत्यू पुणे दि २५/३/२०१५ जन्म नोदणी करतांना बाळाच्या नावाबाबत घ्याव याच्या काळजीबाबत केंद्र शासनाच्या जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम १९६९, कलम १४ च्या तरतुदीनुसार    

सार्वआवि अधिसूचना दि २ मार्च २०१५ महाराष्ट्र जन्म मृत्यु नोंदणी सुधारणा नियम २०१५

Precautions in centoring the name birth recor 29-12-2014

BIRTH & DEATH 25-08-2014

जन्म मृत्यू उशिरा नोंद २०-०१-२०१४

म उपसंचालक, आ से (आमाजीआ) तथा उपमुख्य निबंधक जन्म- मृत्यू पुणे दि ७/८/२०१३ जन्म मृत्यू नोंदणी अनुपलधता प्रमाणपत्र देणे बाबत   

मा उपसंचालक, आरो से पुणे दि ५/८/२०१३ मृत्यू नोंदणी मध्ये सुधारणा करणेबाबत   

राज्यात केंद्रशासनाच्या जन्म-मृत्यु नोंदणी अधिनियम १९६९ व महाराष्ट्र राज्य जन्म-मृत्यु नोंदणी नियम २००० मधील तरतुदीनुसार जन्म-मृत्यु घटनांची नोंदणी नियमितपणे करणे बंधनकारक आहे.
१) मृत्यु नोंदणी बंधनकारक असूनही राज्यात घरी होणारे मृत्यु तसेच अर्भक व माता मृत्यु यांच्या नोंदणीचे प्रमाण कमी असल्याने राष्ट्रीय पातळीवर मृत्यु नोंदणीचे प्रमाण कमी असून हे फक्त ६७ टक्के असल्याचे महानिबंधक, जन्म-मृत्यु, भारत सरकार नवी दिल्ली यांनी त्यांचे दिनांक ८.३.२०१३ च्या पत्रात नमूद केले आहे. (
२) राष्ट्रीय पातळीवर मुख्य निबंधक जन्म-मृत्यु यांच्या दिनांक ५ व ६ मार्च २००९ यांचे बैठकित सुचविलेल्या मुद्दा क्र.२.३ मध्ये मृत्यु नोंदीत वाढ करण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रात मृत्यु झालेल्या परंतु मृत्यु नोंदणी न झालेल्या घटनांची नोंद करण्यासाठी भर देण्याबाबत सुचित करण्यात आले आहे.
३) नोंद न होत असलेल्या मृत्युचा शोध घेण्यासाठी स्मशान भुमी/दफन भुमी येथील प्रभारी व्यक्ती /तेथील काळजी घेणारा कर्मचारी यांना अधिसुचक म्हणून जबाबदारी देण्यात यावी. तसेच त्यांना मृत्यु हा घरी अथवा दवाखान्यात झाला आहे. तसेच मृत्युचे ठिकाण इत्यादी माहिती विनचुक भरण्याच्या सुचना सुध्दा देण्यात याव्यात.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

07-05-2013 जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम १९६९ कलमे १२ नुसार प्रथम प्रत मोफत

निबंधक / उप निबंधक यांना कलम १२ नुसार जन्म-मृत्यु घटना घडल्यापासुन २१ दिवसांच्या आत घटनेची माहिती प्राप्त झाल्यास प्रथम प्रत विनामूल्य देण्या बाबतची कार्यवाही करणे बाबत सूचना दिल्या होत्या. या संदर्भात केंद्रशासनाच्या उपमहानिबंधक जन्म-मृत्यु यांनी सदरची प्रथम प्रत त्वरीत देण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. यास्तव आपणांस सूचित करण्यांत येत आहे की, २१ दिवसांच्या आत कलम ८ व ९ नुसार, घटनेची माहिती देणा-या व्यक्तीस निबंधकाने जन्म व मृत्यु घटनेची नोंद करुन त्वरीत प्रथम प्रमाण पत्र मोफत वितरीत करावे.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

05-06-2013 Issue of non availabity Certificate under section 17 & Corresponding Rule 13(3) RBD ACT 1969

दिनांक 08-03-2013 To_improve_the_reporting_of_registration_of_Death

Issue_of_extract_to_the_informant_under_Section_12_and_Penalties_under_section_23_Registration_of_birth_and_deaths_(RBD)_Act_1969 21-12-2012

हरविलेल्या /बेपत्ता व्यक्तीच्या मृत्यूचे ठिकाण मृत्यू दिनांक ग्राह्य धरणे बाबत दिनांक ३०/१०/२०१२

Guidelines for Reconstruction of destroyes of mutilated reg rec दिनांक 22-08-2017

BIRTH & DEATH दिनांक 12-03-2012

143 (a) Clarificarion regarding determination of place and date of death of a Missing_person दिनांक 29-12-2011

मृत्यू प्रमाणपत्रात नेत्रदान नोंद घेण्याबाबत २१-०५-२०११

मा. उपमहानिबंधक जन्म व मृत्यु, भारत सरकार, नवी दिल्ली यांनी सदर प्रकरणावर त्यांचे अभिप्राय कळविले असून, त्यांच्या अभिप्रायप्रमाणे मृत्यू प्रमाणपत्रामध्ये नेत्रदानाबाबतची नोंद घेता येणे शक्य होणार नाही असे नमूद केले आहे.

Inclusion of a column in death certificate on eye donation 27-04-2011

जन्म मृत्यू नोंदी बाबत आदेश निर्गमित करणे दिनांक ०८-०७-२०१०

जन्म मृत्यू नोंदी बाबत दिनांक ०३-०६-२०१०

अनुपलब्धता प्रमाणपत्र देणे बाबत दिनांक २७-०७-२००९

नावात बदल करणे दिनांक ०९-०९-२००९

१) नविन जन्मलेल्या मुलाच्या नावाबाबत सदर परिपत्रक काढण्यात आलेले होते. या मध्ये मुलाच्या नावाची (वडिलाचे नाव, आईचे नाव, आडनाव याची नाही) नोंदणी झाल्यावर ते नाव संपूर्णतः बदलता येत नाही असे कळविले होते. सदर नविन जन्मलेल्या मुलाचे नाव नोंदविताना कोणतीही औपचारीक चूक झालेली असेल किंवा काही लेखन प्रमादाने चूक झालेली असेल. (उदा, काना, मात्रा, बेलांटी इ.) तर त्यात कलम १५ अनुसरुन बदल करता येतो. परंतु नविन जन्मलेल्या मुलाचे नाव पुर्णपणे बदल करण्याची तरतूद अधिनियमात नाही याची नोंद घ्यावी. (उदा. मूळ नाव रमेश आहे व नंतर महेश ठेवण्यात आले.)
२) आई वडिल यांचे नावात चूक झालेली असेल तर त्या बाबतचे सबळ पुरावे (शासकिय दस्त) सादर केल्यावर निबंधक, त्यांची खात्री पटल्यावर त्याबाबत नोंदवहीतील शेरा रकान्यात याबाबतची नोंद घेवून त्यानुसार प्रमाणपत्र अदा करु शकतो.
३) जर टोपण नावाची नोंद झालेली असेल अथवा माहेरच्या नावाची नोंद झालेली असेल तर त्या बाबतचे सबळ पुरावे संबंधिताने सादर केल्यावर निबंधक कलम १५ व नियम ११ (४) च्या अधिन राहून चूक दुरुस्ती करु शकतो.
४) काही वेळेस प्रमाणपत्र घेवून गेल्यावर बऱ्याच वर्षानंतर नावातील चूक दुरुस्ती बाबत अर्ज केले जातात. अशा प्रकरणात सदर प्रमाणपत्र प्राप्त झाल्यावर तात्काळ याबाबत न कळविण्याची कारणे शोधून काढणे आवश्यक असते. तसेच जुन्या प्रमाणपत्राचा वापर कोणत्या कारणासाठी केला याची चौकशी होणे आवश्यक असते. याबाबत संबंधित निबंधकाची खात्री पटल्यावरच कलम १५ अनुसरुन पुढील कार्यवाही होऊ शकते.
५) समाजाचे नाव, अडनाव म्हणून लावता येत नाही किंवा व्यवसायाचे नाव अडनाव म्हणून लावता बेत नाही. तसेच जाल, गाव किंवा इतर कोणत्याही बाबीचा उल्लेख अडनावात करता येत नाही. (उदा. बागबान, शिंपी, कोळी, वाणी, तेली, पाटील इ.) जर चुकीने असे झालेले असल्यास त्याबाबतचे पुरावे सादर केल्यावर कलम १५ व नियम ११(४) यास अनुसरुन पुढील कार्यवाही करता येऊ शकते.
६) वरील प्रमाणे चुका, आईवडिलांचे नाव नोंदविताना किंवा अडनाव लिहीताना होण्याची शक्यता असते. अशा चुका योग्य शासकिय पुरावे, प्राप्त झाल्यावर व निबंधकाची त्याच्या सत्यतेबाबत खात्री पटल्यावर त्यात कलम १५ व नियम ११ अन्वये चुक दुरुस्ती करता येऊ शकते.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

नावात बदल करणे दिनांक 08-09-2008

Registration of Birth & Deaths – issuance of Non-availability Certificate दिनांक 31-07-2007

Registration Of death of Central Public and para-Millitary Forces in Operational Areas दिनांक14-02-2003

दत्तक घेतलेल्या बालकाच्या जन्माची नोंद करणेबाबत     म उपसंचालक, आ से (आमाजीआ) तथा उपमुख्य निबंधक जन्म- मृत्यू पुणे जाक्र आमजीआ/कक्ष-८३/दत्तक बाजन्मनोंद/ १२२८१-३४०/ दि ५/१०/२००१

हरविलेल्या व्यक्ती बाबत मृत्यूची नोंद करण्यासंबधी स्पस्टीकरण म उपसंचालक, आ से (आमाजीआ) तथा उपमुख्य निबंधक जन्म- मृत्यू पुणे जाक्र आमजीआ/कक्ष-८३/हव्यमृनो/१००२४-५५/२००० दि १/११/२०००

मा.महानिबंधक जन्म, मृत्यू, भरत सरकार, नवी दिल्ली यांनी उपरोक्त संदर्भीय परिपत्रक काढून हरवलेल्या व्यक्तीबाबत मृत्युची तोंद कशी करावी याचा सविस्तर स्वरुपाचा खुलासा यामध्ये केलेला आहे. या परिपन्नकात असे बमूट केले आहे की, हरवलेली व्यक्ती ज्या तारखेपासून हरवलेली आहे त्या दिवसापासून सात वर्षाचा कालावधी उलटून गेला असेल व न्यायालयाने निकाल द्विला असेल तर कोर्टाच्या आदेशानुसार ठिकाण व तारीख लक्षात घेऊन मृत्युची नोंदणी कराची या संबंधी जन्म मृत्यु नोद कायदा १९६९ व जल्म मृत्यु नोंदणी नियम २००० मधे खुलासा नाही

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम २००० सार्वआवि क्र जमृनो १०९९/८९६/प्रक्र १७३/ कु क ३ दि २० एप्रिल २०००  

Registrtion of birth of children taken on adoption    भारत सरकार गृह मंत्रालय, Dy Regi General, दिनांक १४/७/१९९९

०१/०४/१९७० पूर्वी झालेल्या जन्म किंवा मृत्यू घटनांची नोंद करण्याबाबत दि ०४-०५-१९९९

BIRTH & DEATH दिनांक 5-9-1985

ग्रामपंचायती मार्फत जन्म नोंदणी दिनांक १९-०१-१९७०

शासन निर्णय क्रमांक-व्हीपीएम-२६६८-२०१९०-ई, दिनांक २१ डिसेंबर १९६८ अन्वये खेडयांतील जन्म, मृत्यू आणि विवाह नोंदणीचे काम पूर्वी तलाठी, पोलीस पाटील यांचे मार्फत होत असे ते काम त्यांच्याकडून काढून दिनांक १ एप्रिल १९६९ पासून ग्राम पंचायतीकडे सोपविण्यात आले. जन्म, मृत्यु व विवाह यासंबंधीचे दिनांक १ एप्रिल १९६९ पूर्वीचे रेकार्ड पंचायतीकडे द्यावयाचे किंवा कसे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत शासन आदेश देत आहे की, दिनांक । एप्रिल १९६९ प्रर्वीचे रेकॉर्ड तहसील कार्यालयांत ठेवण्यांत यावे. दिनांक १ एप्रिल १९६९ पासूनचे रेकॉर्ड ग्रामपंचायत कार्यालयात राहील. अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

ग्रामपंचायती मार्फत, जन्म, मृत्यू आणि विवाह नोंदणी    ग्रामविकास विभाग, शा नि क्र व्हीपीएम २६६८/३०३०९०-ई दि २१/१२/१९६८

शासन निर्णय दिनांक २१ डिसेंबर १९६८ ग्राम पंचायती मार्फत, जन्म, मृत्यु आणि विवाह नोंदणी.
महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग,

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

वेबसाइटचा उद्देश :-https://gr.ravindrachavan.in/ मुख्य उद्देश शासकीय निर्णय आणि परिपत्रके यांचा संग्रह एका केंद्रित व्यासपीठावर उपलब्ध करणे हा आहे. यामुळे नागरिक, संशोधक, आणि प्रशासकीय अधिकारी यांना आवश्यक माहिती त्वरित मिळू शकते. 

या संकेतस्थळावर दिनांक निहाय व विषयनिहाय शासकीय निर्णय, राजपत्र, आणि इतर महत्वाचे दस्तऐवज डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत, ज्यामुळे नागरिकांना ही माहिती सहज उपलब्ध होते.

© 2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept

Privacy & Cookies Policy