Home कर्मचारी हितार्थगृह विभाग धार्मिक देवस्थाने बांधकामासाठी लागणारी कायदा व सुव्यवस्था

धार्मिक देवस्थाने बांधकामासाठी लागणारी कायदा व सुव्यवस्था

by GR Team
0 comments 105 views

गृह विभाग शासन निर्णय दिनांक 07-05-2018 धार्मिक स्थळाांच्या बाांधकािास सुरुवात करण्यापूर्वी गृह विभागाचे ना हरकर प्रमाणपत्र

धार्मिक स्थळाचे अनधिकृत बांधकामास आळा घालण्याच्या दृष्टीने संदर्भाधीन दिनांक ७जून, २००० व दिनांक २३.११.२००९ च्या परिपत्रकाअन्वये दिलेले निर्देश पुढीलप्रमाणे सुधारणा
१) महानगरपालिका क्षेत्रातील धार्मिक स्थळाचे नवीन बांधकाम, वाढीव बांधकाम वा पुर्नबांधणीचे प्रस्ताव संबंधित महानगरपालिका आयुक्तांनी बांधकामाच्या आराखड्यास प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देण्यापूर्वी प्रशासकीय विभाग म्हणून नगरविकास विभागास पाठवावेत.
२) नगरपालिका/नगरपंचायत क्षेत्रातील धार्मिक स्थळाचे नवीन बांधकाम, वाढीव बांधकाम वा पुर्नबांधणीचे प्रस्ताव संबंधित जिल्हाधिका-यांनी बांधकामाच्या आराखड्यास प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देण्यापूर्वी प्रशासकीय विभाग म्हणून नगरविकास विभागास पाठवावेत.
३) ग्रामपंचायत क्षेत्रातील धार्मिक स्थळाचे नवीन बांधकाम, वाढीव बांधकाम वा पुर्नबांधणीचे प्रस्ताव संबंधित जिल्हाधिका-यांनी बांधकामाच्या आराखड्यास प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देण्यापूर्वी प्रशासकीय विभाग म्हणून महसूल व वन विभागास पाठवावेत.
४) नगर विकास / महसूल व वन विभागाने प्राप्त प्रस्ताव परिपूर्ण असल्यास कायदा, सुव्यवस्था व रहदारीच्या अनुषंगाने गृह विभागाकडे अनौपचारिक संदर्भाद्वारे ना-हरकत प्रमाणपत्राची मागणी करावी.
५) गृह विभाग संबंधीत पोलीस आयुक्त / पोलीस अधिक्षक / पोलीस महासंचालक यांच्याकडून अभिप्राय प्राप्त करुन घेवून-ना-हरकत प्रमाणपत्राबाबत निर्णय घेईल.
६) गृह विभागाकडून कायदा, सुव्यवस्था व रहदारीच्या अनुषंगाने ना-हरकत प्रमाणपत्र संबंधित प्रशासकीय विभागास पाठविण्यात येईल.
७) गृह विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त केल्याशिवाय कोणत्याही धार्मिक स्थळाचे बांधकामास / वाढीव बांधकामास / दुरुस्तीस / पुर्नबांधणीस सुरुवात करण्यात येऊ नये.

गृह विभाग शासन निर्णय दिनांक 18-11-2015 पिटिशन फॉर लिव्ह टू सिव्हील अपील क्र.8519/2006 प्रकरणी मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने अनधिकृत धार्मिक स्थळांचे बांधकाम निष्कासित करणे / नियमित करणे / स्थलांतरित करणे या संबंधी कालबद्ध कार्यक्रम आखणे.

महाराष्ट्र शासन गृह विभाग शासन निर्णय तारीख: २१ ऑक्टोबर, २०१५. पिटिशन फॉर लिव्ह टू सिव्हील अपील क्र.८५१९/२००६ प्रकरणी मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने अनधिकृत धार्मिक स्थळांचे बांधकाम निष्कासित करणे / नियमित करणे /स्थलांतरित करणे या संबंधी कालबद्ध कार्यक्रम आखणे.

गृह विभाग शासन निर्णय दिनांक23-11-2009 धार्मिक देवस्थाने बांधण्यासाठी लागणारी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने त्यांना परवानगी/जमीन देणे/अकृषिक परवानगी

गृह विभाग शासन निर्णय दिनांक06-08-2003 धार्मिक देवस्थाने बांधण्यासाठी लागणारी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने त्यांना परवानगी/जमीन देणे/अकृषिक परवानगी
गृह विभाग 04-06-2001 धार्मिक देवस्थाने बांधण्यासाठी लागणारी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने त्यांना परवानगी/जमीन देणे/अकृषिक परवानगी

गृह विभाग शासन निर्णय दिनांक7-6-2000 धार्मिक देवस्थाने बांधण्यासाठी लागणारी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने त्यांना परवानगी जमीन देणे अकृषिक परवानगी

गृह विभाग शासन निर्णय दिनांक14-10-1985 धार्मिक देवस्थाने बांधण्यासाठी लागणारी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने त्यांना परवानगी/जमीन देणे/अकृषिक परवानगी

You Might Be Interested In

You may also like

About Us

वेबसाइटचा उद्देश :-https://gr.ravindrachavan.in/ मुख्य उद्देश शासकीय निर्णय आणि परिपत्रके यांचा संग्रह एका केंद्रित व्यासपीठावर उपलब्ध करणे हा आहे. यामुळे नागरिक, संशोधक, आणि प्रशासकीय अधिकारी यांना आवश्यक माहिती त्वरित मिळू शकते. 

या संकेतस्थळावर दिनांक निहाय व विषयनिहाय शासकीय निर्णय, राजपत्र, आणि इतर महत्वाचे दस्तऐवज डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत, ज्यामुळे नागरिकांना ही माहिती सहज उपलब्ध होते.

© 2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept

Privacy & Cookies Policy