Home कर्मचारी हितार्थसंपूर्ण ग्रामपंचायतमहाराष्ट्र विकास सेवा ग्रामविकास विभाग क्षेत्रीय स्तर अधिका-यांना सक्षम प्राधिक-याच्या पूर्व परवानगीशिवाय बैठक

ग्रामविकास विभाग क्षेत्रीय स्तर अधिका-यांना सक्षम प्राधिक-याच्या पूर्व परवानगीशिवाय बैठक

by GR Team
0 comments 517 views

ग्रामविकास विभागातील क्षेत्रीय स्तरावरील अधिका-यांना सक्षम प्राधिक-याच्या पूर्व परवानगीशिवाय बैठका साठी आमत्रित करण्यासंधर्भात परस्पर आदेश नोटीस न काढण्न्या बाबत ग्राम विकास विभाग शासन निर्णय दिनांक २२-01-२०२१


१. राज्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याशी संबंधित विषयांबाबत मंत्रालयीन प्रशासकीय विभाग स्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या बैठकांकरीता अथवा अतिमहत्वाच्या विषयांवर चर्चा करण्याकरीता मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना आमंत्रित करण्यापूर्वी संबंधित प्रशासकीय विभागाने या विभागाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.
२. ग्राम विकास विभागाच्या अखत्यारितील जिल्हा व तालूका स्तरावरील अधिकाऱ्यांबाबत शासनाच्या अन्य विभागाकडून/क्षेत्रीय कार्यालयाकडून, निवडणूक व आपत्ती व्यवस्थापन वगळता इतर कोणत्याही कामासाठी परस्पर कोणत्याही प्रकारचे आदेश अथवा नोटीस काढता येणार नाही. तथापि, एखाद्या अतिमहत्वाच्या निकडीच्या कामासाठी आदेश किंवा नोटीस काढणे आवश्यक असेल अथवा बैठकीस बोलाविणे आवश्यक असेल तर त्यासाठी जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. ३. सदरचे आदेश मा. राज्यपाल, मा. अध्यक्ष (विधानसभा), मा. सभापती (विधान परिषद), मा. मुख्यमंत्री, मा.उप मुख्यमंत्री इतर विभागाचे मा. मंत्री, मा. राज्यमंत्री, मा. मुख्य सचिव व केंद्र शासनाचे अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकांकरीता लागू राहणार नाहीत.

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

वेबसाइटचा उद्देश :-https://gr.ravindrachavan.in/ मुख्य उद्देश शासकीय निर्णय आणि परिपत्रके यांचा संग्रह एका केंद्रित व्यासपीठावर उपलब्ध करणे हा आहे. यामुळे नागरिक, संशोधक, आणि प्रशासकीय अधिकारी यांना आवश्यक माहिती त्वरित मिळू शकते. 

या संकेतस्थळावर दिनांक निहाय व विषयनिहाय शासकीय निर्णय, राजपत्र, आणि इतर महत्वाचे दस्तऐवज डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत, ज्यामुळे नागरिकांना ही माहिती सहज उपलब्ध होते.

© 2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept

Privacy & Cookies Policy