ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक १६-०४-२०१८ स्मार्ट ग्राम पुरस्कार योजनेतून जिल्हा स्मार्ट ग्राम व तालुका स्मार्ट ग्राम म्हणून निवडण्यात आलेल्या ग्रामपंचायतींना पारितोषिक प्राप्त रकमेतून नाविन्य पूर्ण कामे करणेबाबत
“स्मार्ट ग्राम पुरस्कार” योजनेंतर्गत तालुका स्मार्ट ग्राम व जिल्हा स्मार्ट ग्राम म्हणून निवडण्यात आलेल्या ग्रामपंचयातींनी पारितोषिक प्राप्त रकमेतून खालील नाविन्यपूर्ण कामे करण्याबाबत परवानगी
१) अपारंपारिक उर्जा संबधि अभिनव प्रकल्प,
२) स्वच्छतेबाबत अभिनव प्रकल्प,
३) महिला सक्षमीकरण आणि मुलांना अनुकुल प्रकल्प,
४) स्वच्छ पाणी वितरण प्रकल्प,
५) भौगोलिक माहिती प्रणाली बसविणे (GIS)
६) अंतरराष्ट्रीय मानदंड, मार्गदर्शक तत्वे, संकलन आणि तपासणीसूची तयार करुन दर्जा वाढविण्यासाठी (ISO) प्रकल्प राबविणे.
उपरोक्त नमूद नाविण्यपूर्ण कामाव्यतिरिक्त अन्य कामे घ्यावयाची असल्यास त्याबाबत शासनाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील.अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
या योजनेची उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत : १)पर्यावरण समतोल राखण्यासाठी उपलब्ध नैसर्गिक संसाधनाचा विकास करणे व त्यासाठी लोकसहभाग मिळविणे. २)पर्यावरणाचे भान ठेऊन भौतिक सुविधा उपलब्ध करणे व इको व्हिलेजची संकल्पना राबवून समृध्द ग्राम निर्माण करणे. ३)यासाठी राज्य शासनाच्या विविध विभागाच्या ग्रामस्तरीय विविध योजनांची सांगड घालून योजनांचा समन्वय करणे व जेथे ही संकल्पना राबविण्यासाठी नव्या योजनांची, कार्यक्रमांची गरज आहे, ती पोकळी भरण्यासाठी तसेकार्यक्रम/योजना ग्रामविकास विभागामार्फत कार्यान्वित करणे. ४)मोठया ग्रामपंचायतींना विकास केंद्र म्हणून विकसीत करणे.
योजनेंअंतर्गत घेण्यात येणारे कामे : शासनाकडून प्राप्त झालेल्या या योजनेचा निधी ग्रामपंचायतींना रोपवाटिका व वृक्षसंवर्धन, गावातील घनकच-याचे व्यवस्थापन (मुख्यत: संकलन व प्रक्रिया, विविध जैवीक व पर्यावरण संतुलीत तंत्रज्ञानाचा वापर करून), गावातील सांडपाण्याचे व्यवस्थापन, जलनि:सारण गटारे, रस्त्यावरील दिवाबत्ती- सौर पथदिवे, अपारंपारीक उर्जा विकास व वापर (पवन, सौर,जैवीक, इ.), दहन-दफन भूमी बांधकाम व त्यासाठी आवश्यक इतर सोईसुविधा पुरविणे, स्मृती उद्यान, ग्रामपंचायती अंतर्गत गावे व वाडयांना जोडणारे साकव बांधकाम, उद्याने व बसथांबा, राजीव गांधी भारत निर्माण ग्राम सुविधा केंद्र, पर्यावरण संतुलीत विकासाकरीता इतर नाविन्यपूर्ण प्रकल्प इत्यादी मुलभूत सोयी सुविधा पुरविण्याकरीता देण्यात येईल.अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
-
1.1K
-
1.4K
-
1.5K