311
आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा पुरविण्याच्या अनुषंगाने जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात येणारा विशेष कक्ष (Special Cell) व त्रैमासिक आढावा घेण्यासाठी जिल्हास्तरीय आढ़ावा समिती यांचे पुनर्गठन करण्यात आलेली आहे. अधिक माहिती साठी पीडीएफ download करून घ्यावी.
२. विशेष कक्ष (Special Cell) ची कार्यपद्धती
विशेष कक्ष (Special Cell) यांचेकडे आंतरजातीय / आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांबाबत तक्रार प्राप्त होताच सर्वप्रथम जोडप्याच्या वयाबाबतची माहिती घेऊन ते अल्पवयीन नाहीत याबाबत खात्री करण्यात यावी. त्यानंतर खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
अ) त्यांच्या तक्रारीची नोंद घेण्यात येऊन त्याबाबत चौकशी सुरु करण्यात यावी.
आ) तक्रारीबाबतची तथ्ये विचारात घेऊन त्याबाबत जिल्हाधिकारी यांना अवगत करण्यात यावे. तसेच जोडप्यास सुरक्षागृहाची आवश्यकता असल्यास किंवा त्याबाबत जोडप्याने मागणी केल्यास त्यांच्याकरीता सुरुवातीस एका महिन्याकरीता अल्पदरात सुरक्षागृहाची व्यवस्था करण्यात यावी. त्यानंतर संभाव्य धोक्याचा मासिक आढावा घेऊन प्रकरणपरत्वे त्यांना जास्तीत जास्त सहा महिण्यांपर्यंत सुरक्षागृहाची सुविधा देण्यात यावी.
इ) सदर सुरक्षागृहास पोलीस सुरक्षा पुरविण्यात यावी. तसेच आवश्यकतेनुसार अथवा जोडप्याने ईच्छा व्यक्त केल्यास त्यांना देखील पोलीस सुरक्षा उपलब्ध करून द्यावी.
ई) जोडप्यास असणा-या धोक्याबाबत त्यांना अवगत करण्यात यावे व प्रकरण निकाली निघेपर्यंत सतर्क राहण्याबाबत त्यांना सूचना देण्यात याव्यात. अधिक माहिती साठी पीडीएफ download करून घ्यावी.
You Might Be Interested In
-
1.7K