स्थयी खाते PAN पडताळणीबाबत, 29/05/2017
मुद्रांक विक्रेता परवाना नुतनीकरण, 27/02/2017,
राज्यातील मुद्रांक विक्रेत्यांच्या परवान्यांचे नुतनीकरण करण्यासाठी संबंधित परवानाधारकाबाबत ‘पोलीस पडताळणी अहवाल’ घेतला जातो. प्रचलित कार्यपध्दतीनुसार, या करीता सदर परवानाधारकास संबंधित पोलीस स्टेशनकडे अर्ज करावा लागतो. यासंदर्भात राज्यातील मुद्रांक विक्रेत्यांच्या संघटनांनी या कार्यालयाकडे व शासनाकडे केलेल्या मागणीचा विचार करुन तसेच या संदर्भात शासनस्तरावरुन झालेल्या चर्चेमधील निर्णय विचारात घेवून या संदर्भात राज्यातील सर्व मुद्रांक जिल्हाधिकारी यांना सुचना देण्यात येत आहेत की, मुद्रांक विक्रेत्यांचे परवाने नुतणीकरण करण्यासाठी आवश्यक असलेला पोलीस पडताळणी अहवाल मिळण्याविषयी मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयानेच संबंधित पोलीस स्टेशन यांचेकडे पत्रव्यवहार करावा व पडताळणीबाबतचे अहवाल प्राप्त करुन घ्यावेत. मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी परवान्यांची मुदत संपण्यापुर्वी किमान 3 ते 4 आठवडे अगोदर सदर पत्रव्यवहार करावा, जेणेकरुन परवान्याच्या नुतनीकरणाबाबतचा निर्णय प्रलंबीत राहणार नाही.