Home कर्मचारी हितार्थबांधकाम विभाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील विविध दर्जाच्या रस्त्यांवर, शासकीय इमारतीच्या आवारात शासकीय इमारतीच्या छतावर, विविध दर्जाच्या रस्त्यांच्या ROW मध्ये खाजगी जाहिराती फलक उभारण्याचे हक्क देण्यासंदर्भात मार्गदर्शक सुचना.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील विविध दर्जाच्या रस्त्यांवर, शासकीय इमारतीच्या आवारात शासकीय इमारतीच्या छतावर, विविध दर्जाच्या रस्त्यांच्या ROW मध्ये खाजगी जाहिराती फलक उभारण्याचे हक्क देण्यासंदर्भात मार्गदर्शक सुचना.

by GR Team
0 comments 452 views

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील विविध दर्जाच्या रस्त्यांवर, शासकीय इमारतीच्या आवारात शासकीय इमारतीच्या छतावर, विविध दर्जाच्या रस्त्यांच्या ROW मध्ये खाजगी जाहिराती फलक उभारण्याचे हक्क देण्यासंदर्भात मार्गदर्शक सुचना.

महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व रस्त्यांवरील जाहीरातीसंबंधी प्राप्त झालेल्या सर्व प्रस्तावास संबंधित मुख्य अभियंता यांच्या स्तरावर मान्यता देण्यात येईल. सदर जाहीरातीसाठीच्या मान्यतेचा कालावधी ५ वर्षांचा राहील. सदर मान्यतेच्या कालावधीस मुदतवाढ देण्यात येवू नये व त्या जागेवरील जाहीरातीसाठी नव्याने निविदा प्रक्रिया करावी.
२. जाहीराती उभारण्यासंबंधी प्राप्त झालेल्या सर्व प्रस्तावाप्रकरणी दि.१३.७.२०१६ रोजीच्या शासन परिपत्रकान्वये देण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचना व कार्यपद्धतीचा अवलंब करावा. सदर मार्गदर्शक सुचना व कार्यपद्धतीवर आधारीत योग्य ते कलम, अटी-शर्ती नमूद केलेल्या ई-निविदा मागवून त्याद्वारे उच्चत्तम बोलीदाराची / रक्कम देणाऱ्या निविदाधारकाची यशस्वी उद्योजक म्हणून प्रचलित नियमानुसार व उक्त शासन परिपत्रकामध्ये नमूद मार्गदर्शक सुचनांनुसार नेमणूक करण्यात यावी.
३. सूचनाफलक/जाहीरातफलक सर्वार्थाने सुरक्षित असतील याची हमी/हमीपत्र उद्योजकाकडून प्राप्त करुन घ्यावे. उद्योजकाने नैसर्गिक आपत्ती, रस्ते सुरक्षा तसेच नागरी सुरक्षा विचारात घेता सर्व जाहिरात फलकांचे दर सहा महिन्यांनी सक्षम त्रयस्थ शासकीय यंत्रणेमार्फत सुरक्षा परिक्षण करुन त्याबाबतचे प्रमाणपत्र कार्यकारी अभियंता यांना सादर करावे. तसेच जाहीरात फलकांच्या सुरक्षिततेबाबत अधीक्षक अभियंता यांनी मान्सुन पूर्व, मान्सून दरम्यान व मान्सुननंतर असा वर्षातून तीन वेळा आढावा घ्यावा.
४. सूचनाफलक/जाहीरातफलक सुरक्षित ठेवण्याची पूर्णपणे जबाबदारी ही उद्योजकाची राहील. यानुषंगाने कोणतीही दुर्घटना घडल्यास त्यास संबंधित उद्योजक सर्वस्वी जबाबदार राहतील. अधिक माहिती साठी पीडीएफ download करून घ्यावी.

You Might Be Interested In

You may also like

About Us

वेबसाइटचा उद्देश :-https://gr.ravindrachavan.in/ मुख्य उद्देश शासकीय निर्णय आणि परिपत्रके यांचा संग्रह एका केंद्रित व्यासपीठावर उपलब्ध करणे हा आहे. यामुळे नागरिक, संशोधक, आणि प्रशासकीय अधिकारी यांना आवश्यक माहिती त्वरित मिळू शकते. 

या संकेतस्थळावर दिनांक निहाय व विषयनिहाय शासकीय निर्णय, राजपत्र, आणि इतर महत्वाचे दस्तऐवज डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत, ज्यामुळे नागरिकांना ही माहिती सहज उपलब्ध होते.

© 2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept

Privacy & Cookies Policy