Home कर्मचारी हितार्थकार्यालयीन मार्गदर्शक शासकीय कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ सार्वजनिक समारंभात सहभागी होणे… निर्बंध

शासकीय कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ सार्वजनिक समारंभात सहभागी होणे… निर्बंध

by GR Team
0 comments 619 views

राज्य शासनाच्या कर्मचा-यांनी सामाजिक-धार्मिक संस्थांचे सदस्य होणे. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९….
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्रमांक सीडीआर-१००९/प्र.क्र.८/०९/११, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२. दिनांक : ७ जूलै, २००९
.

शासकीय कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ सार्वजनिक समारंभात सहभागी होणे… निर्बंध
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक सीडीआर-१३०७/प्र.क्र.८/०७/११, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२. दिनांक : २७ जुलै, २००७.

-महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ च्या नियम १३ मध्ये, शासकीय कर्मचाऱ्याच्या सन्मानार्थ सार्वजनिक समारंभ कोणताही शासकीय कर्मचारी, शासनाची पूर्वमंजूरी मिळाल्याखेरील त्याच्या संबंधातील किंवा दुसऱ्या कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याच्या संबंधातील कोणत्याही गौरवपर भाषण समारंभास किंवा निरोप समारंभास मान्यता देणार नाही किंवा कोणतेही प्रशस्तिपत्रक स्वीकारणार नाही किंवा त्याच्यासाठी अथवा दुसऱ्या कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यासाठी आयोजण्यात आलेल्या मनोरंजनपर कार्यक्रमास किंवा सभेस उपस्थित राहणार नाही, अशी स्पष्ट तरतूद करण्यात आलेली आहे. वरीलप्रमाणे आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमास व त्यात सहभागी होण्याकरीता शासनाच्या पूर्वमान्यतेची आवश्यकता आहे, ही बाब वंगळ्यानं सांगण्याची गरज नाही.
२. असे निदर्शनास आले आहे की, राज्यशासकीय अधिकारी/कर्मचारी शासनाच्या पूर्वमान्यतेशिवाय त्यांच्या गौरवपर/निरोप समारंभाच्या कार्यक्रमात सहभागी होतात. तसंच प्रशस्तिपत्रक स्विकारतात व अन्य अधिकारी/कर्मचारी सदर कार्यक्रमाच्या आयोजनात सहभागी होतात व मनोरंजनपर कार्यक्रमास उपस्थित राहतात. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील तरतूदींचा भंग होतो.
३. याबाबतीत पुन्हा एकवार असे निदर्शनास आणून देण्यात येत आहे की, कोणताही शासकीय कर्मचारी, शासनाची पूर्वमंजूरी मिळाल्याखेरील त्याच्या संबंधातील किंवा दुसऱ्या कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याच्या संबंधातील कोणत्याही गौरवपर भाषण समारंभास किंवा निरोप समारंभास मान्यता देणार नाही किंवा कोणतेही प्रशस्तिपत्रक स्वीकारणार नाही किंवा त्याच्यासाठी अथवा दुसऱ्या कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यासाठी आयोजण्यात आलेल्या मनोरंजनपर कार्यक्रमास किंवा सभेस उपस्थित राहणार नाही.
४. सर्व विभागप्रमुख व कार्यालय प्रमुख यांनी वरील सुचना त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणाव्यात. या सुचनांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांच्याविरुध्द शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी.

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

वेबसाइटचा उद्देश :-https://gr.ravindrachavan.in/ मुख्य उद्देश शासकीय निर्णय आणि परिपत्रके यांचा संग्रह एका केंद्रित व्यासपीठावर उपलब्ध करणे हा आहे. यामुळे नागरिक, संशोधक, आणि प्रशासकीय अधिकारी यांना आवश्यक माहिती त्वरित मिळू शकते. 

या संकेतस्थळावर दिनांक निहाय व विषयनिहाय शासकीय निर्णय, राजपत्र, आणि इतर महत्वाचे दस्तऐवज डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत, ज्यामुळे नागरिकांना ही माहिती सहज उपलब्ध होते.

© 2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept

Privacy & Cookies Policy