Home कर्मचारी हितार्थकार्यालयीन मार्गदर्शक अधिकारी कर्मचारी कार्यभार हस्तांतरण

अधिकारी कर्मचारी कार्यभार हस्तांतरण

by GR Team
0 comments 1.5K views

अधिकारी कर्मचारी यांनी कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र सादर करणेबाबत ग्रामविकास विभाग शासन परिपत्रक २९-०८-२०२२

सा.प्र.वि.च्या संदर्भाधीन परिपत्रकान्वये, मंत्रालयातील सर्व प्रशासकीय विभागातील अधिकारी/कर्मचारी यांची एका विभागातून दुसऱ्या विभागात तसेच विभागांतर्गत बदली होत असताना संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी " कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र " व्यवस्था लागू करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या सदर परिपत्रकास अनुसरून विभागातील सर्व अधिकारी / कर्मचारी यांना कळविण्यात येते कि, अधिकारी / कर्मचारी यांनी बदली/पदोन्नती/प्रतिनियुक्ती या कारणास्तव विभागातून / कार्यासनातून कार्यमुक्त होताना सा.प्र.वि.च्या शासन परिपत्रकातील प्रपत्र-अ, ब, क, ड प्रमाणे कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.
सदर कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र ५ प्रतीत सादर करावयाचे असून, प्रमाणपत्रावर पदमुक्त व पदमोचक दोन्ही अधिकारी/कर्मचारी यांच्या स्वाक्षरी असाव्यात. सदर प्रमाणपत्राची प्रत स्वतःकडे ठेवावी, संबंधित कार्यासनाच्या अभिलेखामध्ये जतन करावी. तसेच, प्रत्येकी एक प्रत आस्थापना शाखा व रोख शाखेस सादर करावी. पदमुक्त अधिकारी / कर्मचारी यांनी हस्तांतरण प्रमाणपत्राची पोच आस्थापना शाखेस दिल्याशिवाय रोख शाखेकडून त्यांचे अंतिम वेतन प्रमाणपत्र (LPC) दिले जाणार नाही अशी तरतूद सा.प्र.वि. दि.२५.०८.२०२२ च्या परिपत्रकात करण्यात आली असल्याची नोंद सर्व अधिकारी/ कर्मचारी यांनी घ्यावी.
अधिकारी/कर्मचारी यांनी उपरोक्त प्रमाणे कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र सादर करण्याची कार्यवाही माहे सप्टेंबर, २०२२ पासून अंमलात येईल.
You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

वेबसाइटचा उद्देश :-https://gr.ravindrachavan.in/ मुख्य उद्देश शासकीय निर्णय आणि परिपत्रके यांचा संग्रह एका केंद्रित व्यासपीठावर उपलब्ध करणे हा आहे. यामुळे नागरिक, संशोधक, आणि प्रशासकीय अधिकारी यांना आवश्यक माहिती त्वरित मिळू शकते. 

या संकेतस्थळावर दिनांक निहाय व विषयनिहाय शासकीय निर्णय, राजपत्र, आणि इतर महत्वाचे दस्तऐवज डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत, ज्यामुळे नागरिकांना ही माहिती सहज उपलब्ध होते.

© 2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept

Privacy & Cookies Policy