राज्य माहिती आयोग, कोकण यांच्याकडे दाखल असलेल्या व्दितीय अपील क्र. केआर-४५२८/२०१५ वर निर्णय देताना, “प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाकडे अभ्यांगतांना अभिप्रायासाठी फॉर्म ठेवण्यात यावेत, सदर फॉर्म ई-मेल व्दारे सेवा पुरविणाऱ्या नोडल प्राधिकरण/पर्यवेक्षकाकडेही पाठविण्यात येतील. सदर अभिप्रायाचे फॉर्म प्रत्येक तिमाहीला संबंधीत अधिकाऱ्यासमोर उघड करण्यात यावेत आणि सदर अधिकाऱ्याची जनतेबरोबरची वागणुकीबाबत त्याच्या गोपनीय अहवालात मुल्यमापन करण्यासाठी वापरण्यात यावेत” असे आदेश माहिती अधिकार अधिनियमाच्या कलम १९ (८) (ओ) अन्वये मा. राज्य माहिती आयुक्त, कोकण खंडपीठ यांनी दिले आहेत. सदर आदेशाची पूर्तता करणे आवश्यक आहे. मा.राज्य माहिती आयुक्त, कोकण खंडपीठ यांच्या सदर आदेशानुषंगाने सर्व विभागांना सूचित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तदनुसार शासन पुढीलप्रमाणे सूचित करीत आहे.
२. “प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाकडे अभ्यांगतांना अभिप्रायासाठी फॉर्म ठेवण्यात यावेत, सदर फॉर्म ई-मेल व्दारे सेवा पुरविणाऱ्या नोडल प्राधिकरण/पर्यवेक्षकाकडेही पाठविण्यात यावेत. सदर अभिप्रायाचे फॉर्म प्रत्येक तिमाहीला संबंधित अधिकाऱ्यासमोर उघड करण्यात यावेत आणि सदर अधिकाऱ्याच्या जनतेबरोबरच्या वागणुकीनुषंगाने त्याच्या गोपनीय अहवालात मुल्यमापन करण्यासाठी वापरण्यात यावेत”.
-
911
-
1.1K
-
634
-
796